-
Papyrus (पपायरस)
कागदाचा शोध लागला नसताना लेखन कसं केलं जायचं ? मौखिक शब्द अक्षररूपात कसे आले? पुस्तकांनी मानवी जगण्याला आकार कसा दिला ? प्राचीन काळी नाइल नदीच्या किनारी उगवणाऱ्या पपायरस वनस्पतीपासून गुंडाळ्या अर्थात भूर्जपत्रं तयार केली जायची. त्यांपासून तेव्हाची पुस्तकं तयार व्हायची. या मौलिक उत्पादनाकरता भांडणं, लढाया व्हायच्या. पुस्तक-निर्मिती आणि जतन करण्याची कहाणी जितकी अस्पष्ट आहे तितकीच ती नाट्यमय आहे. या कहाणीत रक्तपात आहे. राजकारण आहे. संघर्ष आहेत आणि पछाडलेपणही आहे. ती आपल्याला अॅलेक्झँडर द ग्रेटच्या युद्धसंग्रामात नेते. ३८पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतरित झालेली ही पुस्तकांची, पुस्तकवेडाची, पुस्तकाच्या उत्क्रांतीची रंजक आणि कल्पक कहाणी!
-
The Creative Act (द क्रिएटिव्ह ॲक्ट)
कलाक्षेत्र आणि कलाकार अशी काही वेगळी माणसं नसतात. प्रत्येक जण कलाकार असतो हा महत्त्वाचा मुद्दा या पुस्तकात पहिल्यापासून समोर येतो. “एखादी अस्तित्वात नसलेली गोष्ट प्रत्यक्षात आणणं म्हणजे सर्जनशीलता..! एखादं सुसंवादी संभाषण, समस्येवर उत्तर शोधण्याची प्रक्रिया, मित्राला पत्र लिहिण्याची क्रिया, दिवाणखान्यातल्या फर्निचरची रचना बदलणं, ट्रॅफिक जाम टाळून वेगळ्या रस्त्यानं कौशल्यानं गाडी चालवत घरापर्यंत पोहोचणं यापैकी प्रत्येक गोष्ट सर्जनशीलतेत मोडते”, असं रिक रुबिन म्हणतो.
-
Alguj(अलगूज )
हा कथासंग्रह आपल्या हाती देताना मला मनापासून आनंद होत आहे. माणूस आयुष्यात भावनांवर जगत असतो. प्रत्येकाच्या आयुष्याचा आकृतिबंध त्याला येणारे अनुभव आणि मनात उमटणाऱ्या, त्यात गुंतलेल्या भावना यांवर अवलंबून असतो. आयुष्याच्या पटलावर ह्याच भावभावनांच्या रंगाने माणूस चित्र रेखाटत राहतो. प्रेम ही सगळ्यात सुंदर भावना. उदात्त भावना. स्त्री-पुरुषांमधील प्रेमभावना ही मला नेहमीच एखाद्या काव्यासारखी वाटली आहे. ती उदात्त असते. सुंदर असते आणि त्याहीपेक्षा हळवी अलवार असते. प्रेमाने जग जिंकता येते, हे खरं असलं तरी प्रत्येकाला जग नाही जिंकता येत. अव्यक्त राहिलेले प्रेम, अपूर्ण राहिलेली स्वप्ने हा मग जीवनाचा एक हळवा भाग होऊन जातो. अतृप्तीचा आणि आठवणींचा एक झरा काळजात आयुष्यभर पाझरत राहतो. साफल्यात जगण्याचा आनंद असतो, तर अशा अपूर्णतेतही जगण्याची कविता सापडते. अशा काही कविता म्हणजेच या कथा आहेत. आयुष्याच्या प्रवासात काही नाती निसटतात आणि काही परत भेटतातही. निसटलेल्या नात्यांमुळे दोन जिवांच्या आयुष्यात पडणारे अंतर एका जन्माचे असते. ते 'जन्मांतर' असते, तर कधी भेटलेल्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या नात्यातून 'स्वप्नांचा गाव' उभा राहतो. कधी जोडीदाराची 'प्रतीक्षा' हेच फक्त आयुष्य उरतं, तर कधी पुन्हा गवसलेल्या नात्यांची 'गिफ्ट' ही मिळते. कधीकधी नाते पुन्हा नव्याने उमलायला 'उत्तररात्र' लागते. मनात वर्षानुवर्षे रंगवलेला 'संसार' कधी दोन दिवसांसाठी का होईना जगता येतो.
-
Money Power Shrimanticha Expressway (मनी पाँवर श्र
मनी पाँवर श्रीमंतीचा एक्स्प्रेस वे का विकत घ्यावे मी हे पुस्तक ? पैसे आहेत परंतु त्याचे नियोजन, बचत आणि गुंतवणूक नेमकी कशी करावी याचा मनात गोंधळ उडतो. या गोंधळातून बाहेर काढण्यासाठी आणि योग्य मार्ग आणि दिशा देण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयोगी. आपले उत्पन्न किती हे महत्वाचे नसून येणाऱ्या पैशांचे योग्य व्यवस्थापन नेमके कसे करावे हेच महत्वाचे ठरते. यासाठी वयोगट २० ते ५० मधील स्त्री आणि पुरुष जे नोकरी किव्वा छोटा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त. संयम आणि चिकाटीतून दीर्घलाकीन गुंतवणुकीतून उत्तम संपत्ती निर्माण करून आपले पैसे सुरक्षित ठेऊन करोडपती होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त. पैशांकडे आपण नेमके कसे पाहतो आणि त्याबाबत आपली मानसिकता कशी आहे आणि असावी हे ज्यांना जाणून घ्यावयाचे आहे त्यांच्या साठी... म्युच्युअल फंड आणि शेअर बाजार जाणून घेऊन गुंतवणुकीचे विविध मार्ग आणि पर्याय याबाबत सखोल माहिती. यातून आर्थिक वृद्धी नेमकी कशी करावी याबाबत योग्य मार्गदर्शन देणारे पुस्तक
-
Avismarniya Bhartiya Itihasatil Avismaraniya Yoddh
भारतातले पंधरा शूर स्त्री-पुरुष ज्यांनी आक्रमणकर्त्यांपुढे कधीही शरणागती पत्करली नाही. पण इतिहास त्यांना विसरला आणि हरवून बसला. या कथा आहेत, आपल्या अधिकाराचं, श्रद्धेचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी लढलेल्या निडर योद्ध्यांच्या ! काश्मीरचा ललितादित्य मुक्तपीड • आसामचा लचित बारफुकान राजाराज चोल आणि राजेंद्र चोल • कान्होजी आंग्रे गुजरातची राणी नायकी देवी • बंदासिंह बहादूर वारंगलची राणी रुद्रमा देवी त्रावणकोरचे मार्तंड वर्मा मेवाडचा महाराणा कुंभा • इंदोरच्या देवी अहल्याबाई होळकर• उल्लालची राणी अब्बाक्का चौटा • मणिपूरचे राजर्षी भाग्यचंद्र जयसिंग• अहमदनगरची चांद बीबी . शिवगंगा इथली वेलू नचियार. अवधची बेगम हजरत महल