-
Nostaljiya (नॉस्टेल्जिया)
जन्म पुण्याचा , म्हणजे खरीखुरी पुणेकर, वडिलाच्या बदलीमुळे शालेय शिक्षण सोलापूरचा सुप्रसिद्ध हरीभाई देवकरण हायस्कूल झाले. बालपणीचा आठवणी नि सोलापूर याचे नाते अतूट आहे. कॉलेज पदापर्ण केले नि पुन्हा पुणेकर झाले. कर्वे रोडवरील एम. ई. एस. कॉलेजमधून सायन्सची पदवी घेतलि. आनंद पाटणकर चाळीस वर्षापूर्वी लग्न झाले नी मी पक्की पुणेकर झाले. माझ्या कथालेखांची सुरुवात साधारणपणे १९८४-८५ च्या सुमारास झाली. आवाज, मेनका , जत्रा, माहेर, प्रपंच , लोकमत दिवाळी अंकातून माझ्या कथा प्रसिद्ध झाला आहेत. मुलगा-सून, नातू, मुलगी-जावई,दोन नाती असा माझा छोटासा परिवार अहे.दिड वर्षापूर्वी आनंद पाटणकर एकटेपणा घालवीण्यासाठी पेटिंग , बागकाम , लेखन यात मन रमविण्याचा प्रयत्न करीत आहे. सावलीशिवाय जगण खूप कटीण आहे, पण माझे छद मला सावलीसारखी साथ देत ahet.
-
Mi, Misses Eva Hitler (मी, मिसेस इव्हा हिटलर )
अॅडॉल्फ हिटलर म्हंटले की साहजिकच आपल्यासमोर जर्मनीचा क्रूरकर्मा उभा राहतो. ज्यूंचा द्वेष करणाऱ्या हिटलरने लाखो ज्यू नागरिकांची हत्त्या केली. संपूर्ण जगावर राज्य करायचे आणि संपूर्ण जगाचा नाश करायचा, असे स्वप्न पाहणाऱ्या हिटलरच्या हृदयाचा ताबा इव्हा ब्राऊन यांनी घेतला होता. इव्हा व हिटलर यांची भेट खूप उशिरा झाली. तेव्हा हिटलर ४० वर्षांचा होता व इव्हा विशीत. दोन्ही जर्मनीचे एकत्रीकरण व संपन्न राष्ट्र म्हणून जर्मनीला ओळख देण्याचे त्याचे धेय्य पूर्ण होण्यासाठी तिने त्याला पूर्ण साथ दिली. तिने त्याच्यावर मनापासून प्रेम केले. शेवटपर्यंत त्याच्याशी एकनिष्ठ राहिली. म्हणूनच मृत्यूला कवटाळण्याच्या काही तास आधी हिटलरने तिच्याशी विवाह केला. इव्हा ब्राऊन ही इव्हा हिटलर झाली आणि त्यानंतर ते दोघे मृत्यूला सामोरे गेले. त्यांची अद्भूत प्रेमकहाणी मंदा खापरे यांनी 'मी, मिसेस इव्हा हिटलर' मधून यांनी सांगितली आहे. यात इव्हाने तिचे अॅडॉल्फवरील प्रेम तसेच 'युगपुरुष' बनण्याचे त्याची इच्छा, त्याचे चरित्र, त्याच्या व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे यातून दाखविले आहेत.
-
Smrutigandh (स्मृतिगंध)
"सौंदर्य आणि माधुर्य यांचे मीलनस्थळ म्हणजे गोकुळ! रस आणि रास यांची आरास म्हणजे वृंदावन ! राधा-कृष्ण यांचे नाते एक गूढ तर आहेच, शिवाय ते एक विलक्षण गारुडही आहे. युगानुयुगे कुणालाही न उलगडलेले हे कोडे! ज्याने-त्याने आपापल्या क्षमतेप्रमाणे सोडवावे. सुटेल, न सुटेल, पण दोन्हीतही आनंद! मीना जयंत कुलकर्णींनी हे गूढ उकलण्याचा प्रांजळ प्रयत्न केला आहे. राधाकृष्णातील अद्वैताची प्रचिती त्यांना आली, तिचाच हा आविष्कार! 'मधुराभक्ती' चे मनोज्ञ दर्शन घडविण्यात त्यांनी आपली कविता कसास लावली आहे. कवयित्रीचा हा आविष्कार ' मनातलं गोकुळ ' जागं करणारा आहे. वाचताना 'मोरपिस' अंगावरून फिरल्यासारखं वाटणं, हे काय कमी आहे?"