-
Nexus (नेक्सस)
कथांनी आपल्याला जवळ आणलं, बांधून ठेवलं. पुस्तकांनी आपल्या कल्पनांचा आणि मिथकांचा प्रसार केला. इंटरनेटने आपल्याला अमर्याद ज्ञानाची कवाडं खुली करून दिली. अल्गोरिदमला आपली गुपितं समजली आणि आता ते आपल्याला एकमेकांशी झुंजवत आहे. एआय काय करेल ? नेक्सस म्हणजे आपण या क्षणापर्यंत कसे पोचलो याबद्दलचं थरारक कथन… हे पुस्तक येत्या काळात टिकून राहण्यासाठी आणि आपला विकास साधण्यासाठी आपण कोणते निर्णय घेतले पाहिजेत आणि कोणत्या निवडी आत्ताच केल्या पाहिजेत, याचा जाहीरनामा आहे.
-
Papyrus (पपायरस)
कागदाचा शोध लागला नसताना लेखन कसं केलं जायचं ? मौखिक शब्द अक्षररूपात कसे आले? पुस्तकांनी मानवी जगण्याला आकार कसा दिला ? प्राचीन काळी नाइल नदीच्या किनारी उगवणाऱ्या पपायरस वनस्पतीपासून गुंडाळ्या अर्थात भूर्जपत्रं तयार केली जायची. त्यांपासून तेव्हाची पुस्तकं तयार व्हायची. या मौलिक उत्पादनाकरता भांडणं, लढाया व्हायच्या. पुस्तक-निर्मिती आणि जतन करण्याची कहाणी जितकी अस्पष्ट आहे तितकीच ती नाट्यमय आहे. या कहाणीत रक्तपात आहे. राजकारण आहे. संघर्ष आहेत आणि पछाडलेपणही आहे. ती आपल्याला अॅलेक्झँडर द ग्रेटच्या युद्धसंग्रामात नेते. ३८पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतरित झालेली ही पुस्तकांची, पुस्तकवेडाची, पुस्तकाच्या उत्क्रांतीची रंजक आणि कल्पक कहाणी!
-
Unstoppable Us Volume 1 (अनस्टॉपेबल अस खंड -1)
आपण माणसं सिंहांप्रमाणे शक्तिशाली नाहीयोत. आपण माणसं डॉल्फिनप्रमाणे उत्तम पोहू शकत नाही. आणि अर्थात, आपल्याला काही पंखही नाहीत उडायला! मग तरी आपण जगावर राज्य कसं काय गाजवतो? याचं उत्तर आहे विलक्षण वेगळ्या गोष्टींमध्ये दडलेलं. आणि हो, ही गोष्ट खरी आहे बरं! मॅमथची शिकार करण्यापासून स्मार्टफोनवर गेम खेळण्यापर्यंत – आपण इथपर्यंत कसे आलो, असा प्रश्न तुम्हाला पडालाय का कधी ? आपण असे… अनस्टॉपेबल-अजिंक्य कसे झालो? सत्य असं की, आपल्याकडे विलक्षण अशी सुपरपॉवर आहे – गोष्टी- कथा सांगण्याची. आपली गोष्ट सांगण्याची ही सुपरपॉवर वापरून माणसाने जगावर राज्य कसं केलं ? हे जाणून घेऊ या पुस्तकातून… आणि जग बदलण्याकरता तुम्ही या सुपरपॉवरचा कसा उपयोग करून घेऊ शकता ? हेही समजून घेऊ या…
-
Cosmos (कॉसमॉस)
कुतूहलजनके, कल्पक, वाचनीय, विविधांगी... न्यू यॉर्क टाइम्स विश्वाच्या उत्क्रांतीची, विकासाची, जीवनाच्या उत्पत्तीची आणि विज्ञान व सभ्यता एकमेकांसोबत कशा वृद्धिंगत झाल्या, कोणत्या बळांनी आणि व्यक्तिमत्त्वांनी आधुनिक विज्ञानाला आकार दिला याची विलक्षण अशी. कथा हे पुस्तक आपल्याला सांगतं. कार्ल सेगन यांनी या पुस्तकामधून वैज्ञानिक संकल्पना रंजक प्रकारे समजावून सांगितल्या आहेत. सेगन यांची ही क्षमता वाखाणण्याजोगी असून त्यामुळे हे पुस्तक विज्ञानाबद्दलच्या पुस्तकांच्या यादीत अग्रणी आहे आणि कायमच राहील. काय आहे यात : - जवळचे ग्रह आणि अंतराळ मिशन - इजिप्ती चित्रलिपी - मानवी मेंदू - पदार्थ, सूर्य आणि विश्वं यांचं मूळ सूर्याचा अंत - तारामंडळांचा विकास
-
Spy Stories-The Zero Cost Mission (स्पाय स्टोरीज द
द झीरो – कॉस्ट मिशन जमात – ए – इस्लामीच्या कारवायांमुळे भारत – बांगलादेश संबंध बिघडतात. कारण असतं जमातच्या छावण्यांमधून केली जाणारी पाकिस्तानच्या आय.एस.आय.ला मदत. या छावण्यांत प्रशिक्षित एजंट्स भारतात पाठवून दहशतवादी कारवाया करतात. भारताच्या एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सीच्या बांगलादेश ऑपरेशन्सचे प्रमुख विजय शुक्ला एक धाडसी प्लॅन आखतात. त्यासाठी आवश्यक असतो अंगी कौशल्यं असलेला, आव्हानांना भिडण्याची वृत्ती असलेला आणि गरज पडली तर वरिष्ठांबद्दल काहीशी बेफिकिरी दाखवू शकणारा माणूस. असे गुणधर्म अंगी असतील असा ‘ऑपरेटिव्ह’ एजन्सीला मिळेल? मुख्य म्हणजे त्यांची योजना यशस्वी होईल ? थरारक आणि स्वानुभवातून उतरलेल्या इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणाऱ्या दोन कथा… द झिरो कॉस्ट मिशन आणि द वायली एजन्ट !
-
Spy Stories -Terror In Islamabad (स्पाय स्टोरीज -ट
टेरर इन इस्लामाबाद पाकिस्तानातल्या भारतीय दूतावासात सांस्कृतिक अधिकारी म्हणून काम करताना वीरसिंग भारताचा गुप्तचर एजन्ट म्हणूनही काम करत असतो . वीरसिंग एजंटकडे गुप्तचर विभागाने सीक्रेट मिशन सोपवलेलं असतं . तो ते फार सावधपणे पार पाडत असतो… आता त्याची भारतात परत जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली असतानाच… अचानक एका रात्री त्याला पकडण्यात येतं… पाकिस्तानच्या इंटेलिजन्स अधिकाऱ्यांकडून ही कारवाई झाली असते ! तिथून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रश्नच नसतो, प्रश्न असतो तो दुश्मनांच्या त्या प्रदेशात वीर आपली गुपितं , माहिती आणि सोर्सेस यांचं संरक्षण कसं करणार ? तो त्यात यशस्वी होणार का ? थरारक आणि स्वानुभवातून उतरलेली इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणारी कथा… टेरर इन इस्लामाबाद !
-
Chatur (चतुर)
चतुर खरंतर गोष्ट आहे तशी साधी… एका नवख्या लेखकाची इच्छा असते की, मरण्याआधी त्याने लिहिलेल्या गोष्टींचं पुस्तक व्हावं. पण तसं काही घडत नाही, तो मरतो.. मग त्याची बायको ठरवते, आपण करू त्याची इच्छा पूर्ण ! आणि तिला सापडतात त्याने लिहिलेल्या आणखी काही गोष्टी…. आता काय? तिला पडतो प्रश्न. मूळ पुस्तकात या नव्या गोष्टी घालता घालता ती स्वत:देखील लिहू लागते…..! तर ही गोष्ट आहे तशी साधी – मरणाची… आठवणींची… प्रेमाची… बालपणाची…. वयात येण्याची… मोठं होण्याची… तिची… त्याची…. आणि काडेपेटीत अडकलेल्या एका चतुराची…!
-
Dimitri Riyaz Kelkarchi Goshta (दिमित्री रियाझ केळ
प्रणव सखदेव हे समकालीन मराठी कथेला आपल्या वेगळ्या आशयाविष्काराने नवे परिमाण प्राप्त करून देणारे महत्त्वाचे कथाकार आहेत. या संग्रहातल्या त्यांच्या कथा गोष्टी सांगण्यातली सहजता घेऊन येतात. त्या मराठीतील रूढ मध्यमवर्गीय कथेला छेद देत, या जगण्यातील दाहकता आणि अंतरंगातील तळकोपरे धुंडाळत जीवनाशयाला वैशिष्ट्यपूर्ण आयाम मिळवून देतात, बाजारू काळातील अस्थिरतेच्या जीवघेण्या वास्तवाला चित्रित करतात. दांभिकता, हिंस्रता आणि हतबलता यांसह समाजकेंद्रित आणि श्रमिकांशी जोडलेपणातून येणारा अपराधभावदेखील या कथांमधून दिसून येतो. मराठी कथासाहित्यात मध्यमवर्गीयांची कथा हा अलीकडे हेटाळणीचा विषय झाला होता. परंतु या कथा मध्यमवर्गीय जगण्यातील नेमके कंगोरे वास्तव-कल्पितातून उजागर करतात. समकाळाने प्रभावित केलेल्या मानवी जीवनाच्या अनेक मिती या कथनऐवजातून साकार होतात. व्यवस्थेचे अजस्त्र रूप आणि मानवी जीवनानुभवाची क्षुद्रता आकळल्याने सखदेव वास्तवाला अनेक कोनांतून प्रक्षेपित करण्यासाठी या कथांचा वापर करतात. त्यामुळे या कथा एकरेषीयता ओलांडून अनेक दिशांचे पसरलेपण घेऊन येतात. मानवी जीवनाच्या जाणीव-नेणिवांचा शोध घेत या पसरलेपणात समाजभान व्यक्त करणं हे सखदेव यांच्या कथेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट या संग्रहातून पुढे येते.” – दत्ता घोलप
-
Majha Bharat Ujjwal Bharat (माझा भारत उज्ज्वल भारत
२७ जुलै २०१५... याच दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती आणि तरुणांचे लाडके शिक्षक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं निधन झालं. तरुणांना घडवणं हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठीच ते आयुष्यभर देशा-परदेशांत तरुणांशी संवाद साधत फिरले. आणि म्हणूनच की काय, नियतीनेही त्यांना मृत्यू दिला तो विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच! कलाम आता आपल्यात नसले, तरी ते विचाररूपाने कायमच आपल्यात असणार आहेत, त्यातून आपल्याला मार्गदर्शन करत राहणार आहेत. त्यांचे विचार अक्षररूपात आपल्यासमोर यावेत यासाठी कलाम यांचा निकटवर्तीय विद्यार्थी आणि सहलेखक सृजन सिंग पाल यांनी त्यांच्या भाषणातील निवडक उतार्यांचं संकलन या पुस्तकात केलं आहे. प्रेम, सकारात्मकता, मूल्यांची जपणूक, जीवनाविषयक तत्त्वज्ञान, स्वप्नं पाहणं आणि परिश्रमाचं महत्त्वं आदी विषयांवरच्या या भाषणांमध्ये कलाम आपल्या आयुष्यातले अनुभव, कथा-कहाण्या आपल्याशी शेअर करतात. त्यातून आपल्याला एक संदेश मिळतो आणि त्यानुसार कृती करायची प्रेरणा मिळते. या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत – खास करून तरुण पिढीपर्यंत व्हावा म्हणून ही शब्दांजली माझा भारत...उज्ज्वल भारत !
-
Mission India (मिशन इंडिया)
भारत देश बदलण्याची ताकद भारतातल्या तरुण पिढीत आहे, तीच भारताचं आशास्थान आहे. तरुणांचे लाडके गुरू डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक नागरिकापुढे – खासकरून तरुण पिढीपुढे एक मौलिक ध्येय ठेवलं आहे ते म्हणजे, `मिशन इंडिया'चं – विकसित राष्ट्र म्हणून भारताची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावण्याचं, आपलं मानाचं स्थान निर्माण करण्याचं! हे ध्येय साध्य करण्यासाठी कलाम यांनी विकसित देश म्हणजे काय, त्यांची लक्षणं, त्यांची अर्थव्यवस्था आणि भारताची सद्य:स्थिती यांबद्दल तपशीलवार विवेचन पुस्तकात केलं आहे. तसंच भारत विकसित देश व्हावा यासाठी आपण शेती, रसायन उद्योग आणि बायोटेक्नॉलॉजी, उत्पादननिर्मिती उद्योग, संरक्षण, सेवा क्षेत्र आणि शिक्षण व्यवस्था आदी क्षेत्रांमध्ये कशी प्रगती केली पाहिजे, त्यासाठी भविष्यात कोणती पावलं उचलली पाहिजेत याचा सहजसोप्या शब्दांत उदाहरणासह यात ऊहापोह केला आहे. भारताच्या भविष्यकालीन विकासाच्या दिशेचं भान देणारं... सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणारं आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यास प्रेरणा देणारं पुस्तक...मिशन इंडिया !
-
Love In The Time Of Corona (लव्ह इन द टाइम ऑफ करोन
Neeraja/ Ganesh Matkari/ Shreekant Bojevar/ Hrushikesh Palande/ Pranav Sakhadev/ Pravin Dhopat/ Manaswi Lata Ravindra/ Paresh Jayshree Manoharएका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं... Standstill ! या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशलडिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल! ८ लिहिते लेखक.... त्यांच्या खास ८ कथा... कथा नव्याने फुलणाऱ्या प्रेमाच्या... शेवटच्या भेटीच्या..... गावाकडच्या ओढीच्या.... साठीत गवसलेल्या प्रेमाच्या.... करोनाच्या पार्श्वभूमीवर `प्रेम' ही संकल्पना कवेत घेणाऱ्या कथांचा संग्रह... लव्ह इन द टाइम ऑफ करोना!
-
Nabhitun Ugavlelya Vrukshacha Rahasya (नाभितून उगव
खूप वर्षांनी भेटलेले मित्रं सोशल मीडियामुळे ‘कनेक्टेड’ असले, तरी प्रत्यक्षात मात्र बरेच बदललेले असतात. हा ताण त्यांच्या मैत्रीची ‘छत्री’ कशीबशी पेलत राहते... आर्थिक मंदी, ‘आयटी’तले लेऑफ यांमुळे कोलमडू लागलेलं एका जोडप्याचं आयुष्य एक साधा ‘भाजीवाला’ सावरू पाहतो, अन् अचानक गायब होऊन जातो... आचकट बोलणार्या ‘ट’च्या मनात कितीतरी वर्षं एक जखम ठसठसत असते, आणि ती जेव्हा उघडी पडते तेव्हा एक ‘टची गोष्ट’ समोर येते... आधुनिक जगण्याच्या रेट्यात आर्यन-संजिताची मनं एकमेकांपासून एवढी दुरावत जातात, की संबंधांचं ‘अॅबॉर्शन’ होणार आहे हे त्यांना समजत नाही... एका साध्याशा पोस्टमुळे सुरू झालेल्या चर्चेतून जेव्हा ‘अभ्र्यांमागे दडलेल्या फँड्री’चा भेसूर चेहरा समोर येतो तेव्हा सुन्न व्हायला होतं... आपण कुठून आलो, या प्रश्नाचा शोध घेत जेव्हा एक गर्भ भूत-वर्तमान-भविष्य अशा तिन्ही काळात संचार करू लागतो, तेव्हा ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाच्या रहस्या’चा गुंतागुंतीचा गोफ विणला जातो... जगण्यातल्या ताणांचा, पेचांचा-गुंत्यांचा आणि प्रश्नांचा सखोल वेध घेणार्या, वास्तव-कल्पित व मिथककथा यांच्या बांधणीतून तयार झालेल्या ‘आजच्या काळाच्या’ आठ कथांचा संग्रह!