Wise and Otherwise ( वाइज अँड अदरवाइज )
इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा, एक शिक्षिका आणि सुगृहिणी असलेल्या सुधा मूर्ती ह्यांच्या ह्या लेखनाला प्रस्तावना लिहितांना 'द न्यू इंडियन एक्सप्रेस’चे संपादकीय सल्लागार टी. जे. एस. जॉर्ज ह्यांनी म्हंटले आहे, "कन्नड भाषेत श्रेष्ठ दर्जाचं लेखन सातत्यानं करत असणार्या या लेखिकेने 'द न्यू संडे एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रातून प्रथमच स्तंभलेखन केलं. पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणार्या या मालिकेतून त्यांनी स्वत:चे वैयक्तिक अनुभव मांडले. आपण केलेल्या प्रवासाविषयी लिहिलं आणि त्यांना भेटलेल्या असामान्य मनाच्या सामान्य माणसांविषयी सांगितलं. त्यांच्या स्तंभलेखनामधील प्रांजळपणा आणि ताजेपणा लोकांना स्पर्शून गेला व त्याचं लेखन लोकप्रिय झालं’ - असे हे 'तिकडच्या’ वाचकांना आवडलेले लेखन 'इकडच्या’ वाचकांनाही आवडेल हे जाणून लीना सोहोनी ह्यांनी खुद्द लेखिकेनेही समरसून दाद द्यावी इतक्या समरसतेने मराठीत अनुवादित केले आहे.