Vaghya Murali

By (author) Anil Avchat Publisher Shrividya Prakashan

मध्यमवर्गीय माणसांच्या नजरेच्या टप्प्यापलीकडील मानवसमूह, त्यांच्या व्यथा-वेदना, विषम समाजव्यवस्थेत यातनाचक्रातून पिळून निघत असल्यासारखं या मानवसमूहाचं जगणं अनिल अवचट आपल्या लेखनातून वाचकांसमोर आणत असतात. `वाघ्या-मुरळी’ हा असाच एक शोषित समूह. समाजव्यवस्थेचे बळी झालेले हे शोषितांचे समूह नाइलाजानं आणि अगणिकतेनं परस्परांचं शोषण करीत राहतात. अवचटांचे लेखन केवळ वर्णनाच्या पातळीवर राहत नाही. ही परिस्थिती निर्माण होण्यामागची आणि टिकून राहण्यामागची कारणंही अवचट स्पष्ट करत जातात. `वाघ्या-मुरळी’चा पेशा एक असला तरी जातीनुसार त्यांच्यातही श्रेष्ठ-कनिष्ठता असते, याचा प्रत्यय `वाघ्या-मुरळी’त येत राहतो.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category