Me Saayuri

एक कोळ्याची पोर अंगभूत सौंदर्य, हुशारीने बनली सुप्रसिद्ध जपानी गेशा! तिची ही आगळी वेगळी मोहमयी दुनिया! समुद्राकाठच्या खेड्यात स्वच्छ - बागडणारी कोळ्याची पोर चियोचान.... दुर्दैवाला शरण गेलेला तिचा बाप तिला नवव्या वर्षी विकतो आणि ती येऊन पडते गेशा बाजारात. जिथे मुलींच्या मनाचं, शरीराचं शेवटच्या कणापर्यंत शोषण करून त्याची किंमत वसूल केली जाते. तिथे अतोनात कष्ट, अवहेलना, छळ, उपासमार यांचा सामना करता करता अंगभूत सौंदर्य, हुशारी आणि नशिबाची साथ यांच्या जोरावर वयाच्या तिशीपर्यंत ती प्रसिद्ध गेशा सायूरी म्हणून थेट न्यूयॉर्कमधल्या एका टी-हाऊसची मालकीण कशी बनते, याची ही कथा. सांगण्याच्या ओघात इतरही अनेकजणां च्या कहाण्या सायूरी सांगत राहते.हे सगळं घडत असताना आपल्या बहिणीबद्दलची आंतरिक ओढ, निसर्गप्रेम, स्वत:पेक्षा ३१ वर्षांनी मोठ्या असलेल्या चेअरमनबद्दलची उत्कट प्रीतिभावना अशी तिच्या भावनांची आंदोलने व त्यातून स्वत:चा शोध घ्यायचा प्रयत्न हे सगळं एखाद्या कवितेसारखं वाचकांवर गारूड करतं. जपानमधलं सांस्कृतिक जीवन, -दददुसर्‍या महायुद्धाचे भीषण परिणाम, पिढ्यान पिढ्या चपखल योजनाबद्ध, तरीही गुप्तपणे चालू राहिलेली रात्रीच्या फुलपाखरांची ही मोहमयी दुनिया; हे अनोळखी विश्व आपल्याला थक्क करून सोडतं!

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category