Shivray M (शिवराय)

By (author) Manohar Satpute Publisher Dnyaneshwari Prakashan

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आतापर्यंत कोणी केलेला नव्हता. लढायांव्यतिरिक्त महाराजांचे अनेक क्रांतीकारी निर्णय अत्यंत दूरदर्शी आणि समाजमनावर शेकडो वर्षे प्रभाव टाकणारे आहेत. आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक क्रांती करताना अंधश्रद्धा निर्मूलन करून लोकशाही राज्यव्यवस्था आणि पंचायत राज ही संकल्पना अस्तित्वात आणली. जातीपातीच्या अभेद्य भिंती पाडून समतेची मुहूर्तमेढ वयाच्या पाचव्या वर्षी रोवली. उद्धवस्त पुणे शहरातील जमिनीवर सोन्याचा फाळ लावलेला नांगर चालवून हाती असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा लोक कल्याणासाठी कसा उपयोग करावा याचा आदर्श दाखवून दिला. अर्थात जिजाऊसाहेबांच्या सर्व गोष्टीच्या कर्त्या धर्त्या होत्या हे वेगळे सांगणे नको. महाराजांनी वतनदारांच्या ताब्यात असलेल्या खाजगी जमिनीचे राष्ट्रीयकरण करून गरीब श्रीमंत यातील दरी कायमची बुजविण्याचा कांतीकारक प्रयोग केला. महाराजांनी महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी प्रयत्नपूर्वक जलनियोजन केले. पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेबरोबर विहीरी, तलाव, तळे, बंधारे बांधले. याशिवाय अतिक्तित उपलब्ध पाण्याचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी फळबागांना पुरेसे प्रोत्साहन दिले. किल्यावर पावसाळ्यात उपलब्ध होणार्‍या पाण्याचे रेन हार्वेस्टिंग करून थेंब थेंब पाण्याचा उपयोग केला. त्याचाच परिणाम असा की महाराष्ट्रातील कोणताही किल्ला पाण्याच्या अभावामुळे शत्रूला जिंकता आला असे कधीच झाले नाही.

Book Details

ADD TO BAG