Gandhiji (गांधीजी )

By (author) PU.L.Deshpande Publisher Rajhans Prakashan

१९७० साली प्रकाशित झालेल्या पहिल्या आवृत्तीतील मनोगत: महात्मा गांधी जन्मशताब्दी महोत्सवाच्या प्रसंगी केवळ भारतातच नव्हे, तर सार्‍या जगभर त्यांचे पुण्यस्मरण होत आहे. केवळ राजकारणी पुढारीच नव्हेत; तर गायक, नर्तक, चित्रकार, शिल्पकार सारेच जण शब्द, स्वर, रंग, रेखा, अभिनय ह्यांतून आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चालू शकलो नाही, हा त्यांचा दोष नव्हे. गांधीजींच्या चरित्राचे हे लेखन ही त्यांच्या चरणी वाहिलेली माझी लहानशी फुलाची पाकळी आहे. ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही, अशा मराठी वाचकांसाठी मी हे चिमुकले पुस्तक लिहिले आहे. भारतातले सुप्रसिद्ध चित्रकार मुरलीधरपंत आचरेकर यांच्या कुंचल्याचा जादूचा स्पर्श ह्या पुस्तकाला झाला. आता हे पुस्तक पाहताना मला असे वाटते की, आचरेकरांची चित्रेच इतकी बोलकी आहेत की, माझा मजकूर त्या चित्रांच्या बोलण्याच्या उगीचच मध्येमध्ये येऊ लागला आहे. त्यांनी श्रद्धायुक्त अंत:करणातून केलेले हे कार्य असल्यामुळे त्यांच्याबद्दल आभाराची भाषा वापरणे औचित्याला सोडून होईल. हे पुस्तक वाचल्यावर गांधीजींच्याविषयी अधिकारी लेखकांनी लिहिलेली चरित्रे वाचण्याची आणि त्यांचे तत्त्वज्ञान अधिक बारकाईने समजून घेण्याची इच्छा झाली, तर माझ्या ह्या लेखनकामाचे चीज झाले, असे मला वाटेल. हे चरित्र लिहिताना श्री. फ्रान्सिस फ्रेटस्‌ ह्यांनी मला केलेल्या साहाय्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे. ~ पु. ल. देशपांडे

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category