Tai Mi Collector Vhayanu ! (ताई, मी कलेक्टर व्हयनू

By (author) Rajesh Patil Publisher Granthali

प्रतीक्षा करणार्‍या आम्हा सर्वांना गेटच्या बाहेर काढण्यात आले. निकाल चार-पाच नोटीस बोर्डांवर लावल्यानंतर गेट उडण्यात आले. मोठा कोलाहल झाला व निकालासाठी ताटकळत बसलेले सर्वजण नोटीस बोर्डांवर मधमाशांसारखे जाऊन चीपकले. मी बोर्डासमोर उभ्या असलेल्या मुलांच्या कंबरांमधून जागा करून माझे मुंडके मध्ये घुसवले आणि मान वर करून तालिकेकडे बघू लागलो. तालिकेत माझे नाव बघितले तेव्हा माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. माझ्या हृदयाचे ठोके काही सेकंदांसाठी बंद झाले! तालिकेत दिसणाऱ्या माझ्या रँककवरून मला आय.ए.एस. मिळणार हे निश्चित झाले होते. जे मी अनुभवत होतो त्यावर माझा विश्वास बसत नव्हता.मी घरी आतुरतेने वाट बघत असलेल्या स्मिताला आणि नंतर माझ्या माऊलीला-ताईला-आनंदाची बातमी कळवण्यासाठी उतावीळ झाले होतो. त्यांना फोन करतोपर्यंत माझा कंठ दाटून आला होता व डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ताईने फोन उचलताच मी जोराने ओरडलो, "ताई, मी कलेक्टर व्हयनू!"

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category