Tumbadache Khot( तुंबाडचे खोत)

By (author) Shri.Na.Pendse Publisher Continental Prakashan

मराठी भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार ही श्री. ना. पंडसे यांची आजची पदवी आहे. रसिकांची व श्री. पेंडसे यांचीही आजवर समजूत अशी होती की 'रथचक्र' ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी. 'एल्गार'पासून सुरू झालेल्या त्यांच्या कादंबरीयात्रेचा अखेरचा मुक्काम म्हणजे 'रथचक्र'! आणि असे वाटत होते की त्यानंतर स्वभावधर्मानुसार ते कादंबरीलिखाण करतच रहातील पण 'रथचक्र' नंतर काही भव्यतर आलोक असेल, अशी त्यांना व रसिकांना बहुतकरून कल्पनाही नसणार. - पण मराठी कादंबरीचे भाग्य असे की 'रथचक्र' नंतर आता आणखी एक महाकाय अशी लोकविलक्षण कादंबरी पेंडसे यांनी लिहिली आहे, 'तुंबाडचे खोत'. मुळात या दुखंडी कादंबरीचा आवाकाच प्रचंड आहे. तुंबाडच्या खोत घराण्याच्या ज्ञात इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश अमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतच्या अंतिम दशकात, स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रसंगी. म्हणजे जवळपास सव्वशे वर्षांचा हा प्रदीर्घ कालखंड आहे. तुंबाडकर खोतांच्या आद्य पूर्वजांपासूम विद्यमान वंशजांपर्यंत या इतिहासाची व्याप्ती आहे. या चित्रविचित्र इतिहासाच्या मार्गक्रमणात पदोपदी असंख्य स्वभावविशेष अशा व्यक्ती आणि त्या व्यक्तींच्या स्वाभाविक संघर्षातून निष्पन्न होणार्‍या अनिक घटना भेटत रहातात. त्यात पुन्हा एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीसारखी नाही. एक घटना दुसरीसारखी नाही. एकूणएक सर्वच व्यक्ती व घटना स्वत्वविषेष अशा. आणि काळ सव्वाशे वर्षे असला तरी स्थळ मात्र एकच: तुंबाड आणि तुंबाडचा परिसर. तुंबाडच्या खोतांच्या कुलवृतांताची ही बखर ही एखाद्या रम्याद्भुत आणि उग्रभीषण कहाणीसारखी आहे.

Book Details

ADD TO BAG