Dhyasparva(ध्यासपर्व)
रावसाहेबांच्या जीवनाचा आलेख प्रामुख्याने संघर्ष आणि लढे यांनीच चितारलेला आढळून येतो. जे मनाला आणि बुद्धीला भावले, त्याची सदोदित पाठराखण केली. जे भावले नाही, त्याच्या विरोधात परिणामाची क्षिती न बाळगता उभे ठाकले. फुले, गांधीजी आणि कर्मवीर अण्णाना अभिप्रेत असणारी समाजिक व्यवस्था निर्माण करण्याचा जीवनभर ध्यास घेतला. या ध्यासापोटी सत्ता आणि मत्ता यांच्यापासून जाणीवपूर्वक आणि निग्रहाने दूर राहिले. इतकेच नाही तर सर्व समाजिक आणि शैक्षणिक कार्यांत कोणाकडून पै - पाव आण्याची अपेक्षा न करतना पदरमोड करून तनमनधनाने सहभागी झाले. एका ध्येयवादी, संवेदनशील व्यक्तीने जीवनातील अनुभूतींचे केलेले कथन.