Rang Maza Vegla (रंग माझा वेगळा)
डॉ. जगदीश करमळकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात चाळीस डॉक्टरांची वैद्यकीय व्यवसायाव्यतिरिक्तच्या क्षेत्रातील मुशाफिरी आहे. वैद्यकीय व्यवसाय सुरू असताना कला, साहित्य, संगीत, अभिनय, क्रीडा अशा दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवणाऱ्या चाळीस नामवंत व्यक्तींचा परिचय करमळकर यांनी करून दिला आहे. यातील प्रत्येकाला भेटून त्यांच्याशी चर्चा करून हे लेख लिहिलेले असल्याने यात तपशिलातील अचूकता तर आहेच, पण या मंडळींनी दुसऱ्या क्षेत्रातही यशस्वी वाटचाल कशी केली तेही समजते. लेखक झालेले गोडबोले, छायाप्रकाशयात्री जोगळेकर, पक्षीमित्र पांडे, डॉ. सरदेसाई या नामवंत डॉक्टरांसह अन्य अपरिचित अशा डॉक्टरांचीही कामगिरी या पुस्तकामुळे कळते.