Alfred Hitchcock-The Man Who Knew Too Much (आल्फ्र
आल्फ्रेड हिचकॉक म्हणजे संदेहपटांच्या क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट. अर्थात संदेहाशिवाय चित्रपटांतील इतरही अनेक तंत्रमंत्रांचाही तो ’मास्टर’ होता. त्याच्या सर्वच्या सर्व चित्रपटांचा आढावा घेत असताना त्या चित्रमहर्षीच्या बहुमिती प्रतिभेचा आस्वादक वेध घेणारे हे पुस्तक वाचले म्हणजे हिचकॉक हा खर्या अर्थाने चित्रपटसृष्टीतील अजोड असा ’द मॅन हू न्यू टू मच’ होता, याचा थक्क करणारा प्रत्यय येतो.