Prernadayi Antaralyatri Sunita Williams (प्रेरणादा
अंतराळयात्री सुनिता विल्यम्स हिने अवकाशात १९५ दिवस वास्तव्य करण्याची असमान्य कामगिरी केली. २९ तास १७ मिनटांच्या स्पेसवॉक करून तिने महिलांच्या अवकाश भ्रमणात स्व:ताचे विक्रमी नोंदवले. वंशाने भारतीय असलेल्या प्रेमळ पित्याच्या पाठींब्याने सुनिता स्पर्धात्मक आव्हानांना धैर्याने तोंड दयायला शिकली. आनंद सकारात्मक विचाराच्या प्रोत्साहनामुळेच ती पुरुषांच्या जगामध्ये निर्भयतेने वावरली. अमेरिकेच्या भूमीवर वाढली असूनही भारतीयत्वाच्या खुणा जपणा-या सुनीताच्या अपरिमित कष्टांची ही कहाणी. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या सुनीताने जागतिक अवकाश उपक्रमाला अमुल्य योगदान कसे दिले हे प्रत्येकाने अभिमानपूर्वक जाणून घ्यायला हवे. हे सचित्र प्रेरणादायी पुस्तक जीवनात काहीतरी वेगवेगळे करून दाखवण्याची जिद्ध आजच्या विद्यर्थांमध्ये निर्माण करील.