Vibhram (विभ्रम)

By (author) Veena Dev Publisher Bule Bird

व्यक्तिमत्वाप्रमाणं ज्या-त्या लेखकांचे रंग ललितलेखनामधे आपोआपच मिसळले जातात; आणि हे गहिरं, अधिक पारदर्शक होत राहतं. त्या लेखनाची मंडनरचना (desing) घडत रहते. ललितलेखनाला जीवनानुरूप कथनशैलीचा नि विषयमांडणीचा एक वर लाभलेला आहे. वीणा देव ह्यांच्या 'विभ्रम' मधील लेखान्विशायांकडे पहिलं की ह्या गोष्टीची प्रचिती येते. अनुभवाची तीव्रता कमी आणि आविर्भाव किंवा अभिनिवेश अधिक असं लेखन कधीच कसदार किंवा परिणामकारक ठरत नाही. अनुभवाला त्याची म्हणून काही धार किंवा तीक्ष्णता नसेल तर ते लेखन बेगडी ठरतं. वीणा देव ह्यांनी ह्या संग्रहासाठी निवडलेल्या अनुभवांना रसरूपगंधाचा काही अनोखा स्पर्श जात्याच प्राप्त झाला आहे. पण अनुभव कितीही श्रेष्ठ वा आगळावेगळा, दिपवून टाकणारा असला, तरी तो मांडण्याचं लेखकाचं कौशल्या वा हातोटी शिल्लक राहातेच. एरवी 'अनवट'रागांतल्या चीजांसारखं अप्रचलित रूपबंधाचं ललितलेखनही कधीकधी आस्वाद्य ठरतं ते त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे आणि कथनशैलीमुळे.

Book Details

ADD TO BAG