I Dare Kiran Bedi

By (author) Asha Kardale Publisher Mehta Publishing House

आय डेअर' हे किरण बेदींच्या व्यक्तीत्त्वाचे विविध पैलू प्रकट करणारे एक दमदार पुस्तक आहे. अंगी असलेले मूलभूत गुज अनुभवाने कसे अधिकाधिक विकसित होत गेले याचा प्रत्ययकारी आलेख वाचकांपुढे मांडला जातो. लहानपणापासून ते तिहार महानिरिक्षक पदापर्यंतचा प्रवास हा एका विजिगिषु वृत्तीचा निदर्शक आहे. किरण बेदींना मिळत गेलेल्या जबाबदार्‍या या नेहमीच कठीण होत्या. ज्या ठिकाणी परिस्थिती बदलणे अत्यंत कठीण आहे, वस्तुत: अशक्य आहे अशा ठिकाणीच त्यांना पाठवले गेले. परंतू समस्येचा अत्यंत सखोल अभ्यास व त्यावर आधारित कामांची आखणी यामुळे किरण बेदी नेहमीच यशस्वी ठरल्या. एखाद्या झंजावाताप्रमाणे परिस्थिती पालटून टाकण्याचे किरण बेदींचे सामर्थ्य थक्क करणारे आहे. संपूर्ण समाजाला, तरूण पिढीला आदर्शवत ठरणार्‍या या तेजस्वी व्यक्तीत्त्वाची ओळख करून देणारे प्रेरणादायी पुस्तक.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category