Hi Shreenchi Ichha (ही'श्रीं' ची इच्छा)

By (author) Dr. Shree Thanedar Publisher Chemir

इच्छा असेल तर मार्ग दिसतो आणि प्रयत्न केले तर माणूस हवं तिथे पोचू शकतो’ याची साक्ष पटवणारी आजच्या घडीची सत्यकथा म्हणजे ‘ही ‘श्री’ची इच्छा!’ श्रीनिवास ठाणेदार किंवा ‘श्री’ हा बेळगावच्या शाळेतून पंचावन्न टक्के मार्ग मिळवून मॅट्रिक पास झालेला एक सर्वसामान्य मुलगा. नंतर मात्र तो एम्‌एस्‌सीला फर्स्ट क्लास फर्स्ट काय आला, त्यानं अमेरिकेतली डॉक्टरेट ही सर्वोच्च पदवी काय मिळवली आणि यशस्वी उद्योगपती म्हणून नावलौकिक काय कमावला, सर्व काही थरारक आणि कौतुकास्पद ! एका बाजूला पैसा, प्रसिद्धी आणि यश; तर दुसऱ्या बाजूला पत्नीनं केलेली आत्महत्या, समाजानं वाळीत टाकणं आणि परक्या देशात दोन लहान मुलांना ‘बाबा आणि आई’ होऊन वाढवणं! यश अपयश, सुख दु:ख, मान अपमान सर्वच काही टोकाचं ! डॉ. श्रीनिवास ठाणेदार या जिद्दी माणसानं परिस्थितीवर केलेली मात म्हणजे ‘ही ‘श्री’ची इच्छा

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category