Singaporechi Navalkatha (सिंगापूरची नवलकथा)
सिंगापूर... आग्नेय आशियाच्या नकाशातला अगदी टिकली एवढा छोटासा देश. शेजारच्या मे मलेशियाच्या आधाराने जगू पहाणारा… पण त्या देशाने झिडकारल्यानंतर हताश न होता अथक प्रयत्नांची कास धरणारा… त्या सिंगापूरने सर्वांगीण प्रगतीची जी गरुडभरारी घेतली, तिची हि कथा… त्या प्रयत्नामागे प्रेरणा होती लि क्वान यू नावाच्या एका जिद्दी पण द्रष्टया नेत्याची. या नेत्याच्या अफाट कर्तबगारीची ही कथा … भारतीयांनाही प्रेरक ठरावी अशी ...