Rayan (रायन)

By (author) Pratibha Deshpande Publisher Unmesh Prakashan

घरात एखादा पाळीव प्राणी असला तर घरातील वातावरण बदलून जाते. असे घर आनंदी असते असे म्हणतात. प्रतिभा देशपांडे यांचे घर म्हणजे 'अ‍ॅनिमल किंग्डम'च म्हणावे लागेल. पँडी, ब्रँडी, निमो, सोनं, विठ्ठल अशी प्राणी मंडळी, तसेच गल्लीतील श्वान मंडळी रोजच्या जीवनाचा भाग होते, याचा अनुभव 'रायन'च्या येण्याने त्यांच्या कुटुंबात आला. डॉबरमन असलेल्या या श्वानाने या घरावर प्रेम केले. कुटुंबातील सदस्यांशी त्याची जवळीक, त्याचे खेळणे, त्याचे बागडणे हे सर्वांना आनंददायी होते. त्याने घराला जे दिले ते 'रायन'मधून लेखिकेने व्यक्त केले आहे. एका कुत्र्याचे हे आत्मवृत्त असले तरी ते एखाद्या माणसाचा जीवनपट वाचतोय असे वाटते. त्यातील प्रसंग, घटना या कुत्र्याशी निगडीत असल्या तरी आपणही त्यात गुंतून जातो व रायन आपल्या अवतीभवती असल्याचा आभास होतो.

Book Details

ADD TO BAG