-
Tutaleli Taar (तुटलेली तार)
मानवी मनाचा थांगपत्ता लागणं म्हणजे महाकर्मकठीण. दोन जीव विवाह बंधनात अडकल्यावर त्यांचातील नातेसंबंधांचे तरल धागेदोरे उलगडणं जवळजवळ अशक्य. शुभमय आणि त्याची पत्नी ऋती. शुभमय जिल्ह्याच्या न्यायालयाचा जज्ज.पराकोटीचा आदर्शवादी आणि नितीनिष्ठ. ऋती कवयित्री आणि मनस्वी जीवन जगणारी. त्यांची एकुलती एक मुलगी मुनिया. तिच्या वियोगानंतर उभयंताच्या नातेसंबंधात निर्माण झाले अगणित तणाव. ते कोणते आणि पुढे काय घडलं, हे समजण्यासाठी आवर्जून वाचायला हवी सुचित्रा भट्टाचार्य यांनी सूक्ष्म विश्लेषणात्मक अंगानं लिहिलेली बंगाली कादंबरी - 'तुटलेली तर' उत्कंठावर्धक आणि शेवटच्या पानापर्यंत वाचकांना श्वास रोखून धरायला लावणारी.
-
Baji (बाजी)
शिवराय व संभाजी महाराजांनंतर मराठेशाहीचे नाव दुमदुमत ठेवले ते पहिल्या बाजीराव पेशव्यांनी. हिंदू धर्म, मराठ्यांची सत्ता दिल्लीपर्यंत पोचविण्याचे स्वप्न तेजस्वी बाजीने पाहिले आणि पेशवेपदाची वस्त्रे अंगावर चढल्यानंतर पुढील २० वर्षे अतुल्य पराक्रम करीत ते पूर्ण केले. स्वराज्याचा डोलारा एकहाती तोलून धरणार्या बाजीरावाचे आयुष्य अनेक नाट्यमय, संघर्षमय घडामोडींनी भारलेले आहे. त्याचा वेध कुंदन तांबे यांनी ‘बाजी’ या कादंबरीत घेतला आहे. बाजीरावाच्या प्रेमाची, त्याच्या जीवलगांची कहाणीही यात आहे. पेशवा म्हणून त्याने गाजविलेला पराक्रम प्रेरणादायी आहे.
-
Sursawalya (सूरसावल्या)
भारतीय संगीत क्षेत्रातल्या अनेक दिग्गज कलावंतांशी गाजेद्रगडकरांची झालेली ओळख , त्यांतल्या काहींशी त्यांचा झालेला दाट परिचय , काही गुरुतुल्य कलावंत ,अनेक कलावंतांच्या त्यांनी ऐकलेल्या मैफिली इ . विविध गोष्टींचे यथार्थ वर्णन या पुस्तकामधल्या पानापानावर वाचकांना आढळेल . त्यांच्या लिखाणामध्ये 'मी लिहिले- तुम्ही वाचले ' अशी गघप्राय शैली मुळीच नाही . उलट ' वाचताय ना तुम्ही ? मजा येतेय ना वाचताना ? ' अशी नम्र चौकशीपण वाचकाला ठायीठायी जाणवते . एक प्रकारे हे लिखाण म्हणजे बोली भाषेतला मोकाळाढोकळा शब्दाप्रवाहच म्हणायला हवा .
-
Rayan (रायन)
घरात एखादा पाळीव प्राणी असला तर घरातील वातावरण बदलून जाते. असे घर आनंदी असते असे म्हणतात. प्रतिभा देशपांडे यांचे घर म्हणजे 'अॅनिमल किंग्डम'च म्हणावे लागेल. पँडी, ब्रँडी, निमो, सोनं, विठ्ठल अशी प्राणी मंडळी, तसेच गल्लीतील श्वान मंडळी रोजच्या जीवनाचा भाग होते, याचा अनुभव 'रायन'च्या येण्याने त्यांच्या कुटुंबात आला. डॉबरमन असलेल्या या श्वानाने या घरावर प्रेम केले. कुटुंबातील सदस्यांशी त्याची जवळीक, त्याचे खेळणे, त्याचे बागडणे हे सर्वांना आनंददायी होते. त्याने घराला जे दिले ते 'रायन'मधून लेखिकेने व्यक्त केले आहे. एका कुत्र्याचे हे आत्मवृत्त असले तरी ते एखाद्या माणसाचा जीवनपट वाचतोय असे वाटते. त्यातील प्रसंग, घटना या कुत्र्याशी निगडीत असल्या तरी आपणही त्यात गुंतून जातो व रायन आपल्या अवतीभवती असल्याचा आभास होतो.