Baji (बाजी)

By (author) Kundan Tambe Publisher Unmesh Prakashan

शिवराय व संभाजी महाराजांनंतर मराठेशाहीचे नाव दुमदुमत ठेवले ते पहिल्या बाजीराव पेशव्यांनी. हिंदू धर्म, मराठ्यांची सत्ता दिल्लीपर्यंत पोचविण्याचे स्वप्न तेजस्वी बाजीने पाहिले आणि पेशवेपदाची वस्त्रे अंगावर चढल्यानंतर पुढील २० वर्षे अतुल्य पराक्रम करीत ते पूर्ण केले. स्वराज्याचा डोलारा एकहाती तोलून धरणार्‍या बाजीरावाचे आयुष्य अनेक नाट्यमय, संघर्षमय घडामोडींनी भारलेले आहे. त्याचा वेध कुंदन तांबे यांनी ‘बाजी’ या कादंबरीत घेतला आहे. बाजीरावाच्या प्रेमाची, त्याच्या जीवलगांची कहाणीही यात आहे. पेशवा म्हणून त्याने गाजविलेला पराक्रम प्रेरणादायी आहे.

Book Details

ADD TO BAG