Jurassic Park (ज्युरॅसिक पार्क)

ज्युरासिक पार्क’ ही कादंबरी लिहिताना मी अनेक मान्यवर पुराजीवशास्त्रज्ञांच्या संशोधनाचा आधार घेतला आहे. त्यापैकी रॉबर्ट बाक्कर, जॉन हॉर्नरा, जॉन ऑस्ट्रॉम आणि ग्रेगरी ह्यांचा विशेष उल्लेख करायला हवा. ह्या शिवाय मी, केनेथ कारपेंटर, मार्गारेट कोलबर्ट, स्टीफन आणि सिल्व्हिया झेर्कास, जॉन गुर्चे, मार्क हालेट, डग्लस हेंडरसन आणि विल्यम स्टाउट अशा नव्या दमाच्या चित्रकारांच्या चित्रांचाही उपयोग केला आहे. डायनोसॉर कसे दिसत-वागत असावेत ह्याची कल्पना येण्यासाठी ह्या लोकांच्या चित्रांचा उपयोग झाला. नामशेष झालेल्या प्राण्यांच्या डीएनए अवशेषांबद्दलची कल्पना प्रथम चार्लस पेलेग्रिनो ह्यांनी मांडली. त्यांनी जॉर्ज ओ. पॉर्हनर, ज्युनिअर आणि रॉबर्ट हेस ह्यांच्या संशोधनाचा उपयोग केला होता. ह्या दोघा शास्त्रज्ञांनी बर्कलेमधे प्राचीन डीएनए रेणूंच्या अभ्यासासाठी एका गटाची स्थापना केली होती. केऑस सिद्धांताबद्दलची चर्चा ही इव्हर एकलॅन्ड आणि जेम्स ग्लिक ह्यांच्या अभ्यासावर आधारित आहे. संगणकाच्या आज्ञावली आणि त्यांच्यावरचं ग्राफिक्स हे बॉब ग्रॉस ह्याच्याकडून मिळालं आहे. तर आता ह्यात नसलेल्या हेन्झ पागेल्स् ह्यांच्यावरून मी माझा हदान माल्कम उभा केला आहे. ही कादंबरी पूर्णपणे काल्पनिक आहे. त्यात व्यक्त केलेले सर्व विचार आणि मते माझी आहेत. त्याचप्रमाणे पुस्तकामधे मूळ माहितीबद्दल काही चुका असतील त्याला मी जबाबदार आहे. लक्षावधी वर्षापूर्वी पृथ्वीवर महाकाय आकाराचे प्राणी राज्य करत होते. जमीन, आकाश आणि पाणी, सर्वत्र अतिप्रचंड डायनोसॉरनी प्रभुत्व गाजवलं होतं. सुमारे चौदा कोटी वर्षे पृथ्वीवर अधिराज्य गाजवल्यावर अंदाजे साडेसहा कोटी वर्षापूर्वी त्यांचा विनाश झाला. सजीवांच्या जीवाश्मांमधून त्यांचे डी.एन.ए. रेणू मिळवण्याचे आणि क्लोनिंग करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले. मध्य अमेरिकेच्या किनार्‍याजवळच्या एका अगदी आडबाजूच्या बेटावर जैवअभियंत्यांनी मानवाचे सर्वात थरारक स्वप्न साकार केले. पण...... प्रत्येक थरारक स्वप्नपूर्तीला एका काळी बाजूसुद्धा असते...

Book Details

ADD TO BAG