Swapnamadhil Gawa (स्वप्नामधील गावां)
‘केवळ भाषण-लेखनानं भागणार नाही : आपण तसं जगायलाही हवं’ असं तीव्रतेनं जाणवल्यामुळे दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी हे जोडपं ‘निसर्गस्नेही जीवनशैली’ जगण्यासाठी २५ वर्षांपूर्वी पुण्यातून बाहेर पडून कोकणातल्या एका खेड्यात जाऊन स्थायिक झालं. त्यांच्या २५ वर्षांच्या अशा जगण्याचं हे आत्मकथन. त्यांचं हे जगणं जितकं सजगतेनं आहे, तितकंच उत्कटतेनंही. जितकं विचारपूर्वक आहे, तितकंच भावपूर्णही. परिपूर्णतेचा ध्यास आहे; पण, मर्यादांचं भानही. त्यामुळेच, हे दांपत्य ‘असामान्य’ न वाटता, चारचौघांसारखं वाटतं. त्यांची ध्येयं ही आपल्यालाही आपल्या आवाक्यातली वाटतात. त्यांच्यासारखाच प्रयत्न आपणही करावा, अशी प्रेरणा देणारं हे पुस्तक.