Bedakhal ( बेदखल )
मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. भरत वटवानी आणि त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता वटवानी यांनी आतापर्यंत भारतामध्ये रस्त्यांवर दिशाहीन भटकणार्या जवळपास सात हजार मनोरुग्णांवर उपचार करून त्यांची कुटुंबीयांशी पुनर्भेट घडवून आणली आहे. एका अंदाजानुसार, अजूनही जवळपास चार लाख मनोरुग्ण असेच रस्त्यांवर भटकत आहेत. या मनोरुग्णांच्या कथा हृदय पिळवटून टाकणार्या असल्या, तरीही लेखकाने वस्तुनिष्ठ पद्धतीने अनुभवांची मांडणी केली आहे. हे कार्य करण्यास प्रेरणा कशाने मिळाली आणि या प्रश्नासंदर्भात समाज आणि सरकारने काय केले पाहिजे, यावर लेखकाने पुस्तकात नेमकेपणाने भाष्य केले आहे.