The Innocent Man (द इनोसंट मॅन)
अडा या ओक्लाहोमाच्या छोट्या गावातील रॉन विल्यमसन... बेसबॉलमध्ये उज्ज्वल भविष्य असताना दारू आणि अमली पदार्थांच्या आहारी गेलेला, विचित्र वागणारा, आईबरोबर राहणारा एक बेरोजगार, घटस्फोटित, मानसिक विकारांनी त्रस्त तरुण.. नाइट क्लबमध्ये काम करणाऱ्या डेबी कार्टर या कॉकटेल वेट्रेसवर अमानुष बलात्कार करून तिचा खून करण्यात येतो... खुनाच्या आदल्या रात्री ग्लेन गोअर या माणसाबरोबर तिला पाहिल्याचं बNयाच साक्षीदारांनी सांगूनही रॉन विल्यमसनवर या खुनाचा आळ येतो... त्याला खुनी ठरवणारा एकमेव साक्षीदार असतो ग्लेन गोअर... रॉनचा मित्र डेनिस प्रिÂट्झ यालाही त्यात अडकवलं जातं... डेनिसला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते, तर रॉनला मृत्युदंडाची...ते दोघं आपलं निरपराधित्व सिद्ध करू शकतात का याचा थरारक वेध घेणारी सत्य घटनेवर आधारित कादंबरी द इनोसन्ट मॅन