The Mute Anklet (द म्यूट अँक्लेट)
म्हैसूरचे संस्थानिक महाराज. उमा ही त्यांच्या मृत बहिणीची आणि वॉरेन या ब्रिटिश सैनिकाची मुलगी. म्हैसूरच्या किल्ल्याला वेढा घालून बसलेला इंग्रज सैन्यातील देखणा ब्रिटिश तरुण अॅश्टन एका नाट्यमय प्रसंगामुळे महाराजांच्या तावडीत सापडतो. ते त्याच्यासमोर उमाशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवतात. उमाच्या मनात ब्रिटिशांविषयी द्वेष आणि अॅश्टनलाही विवाहबंधनात अडकायचं नसतानाही त्यांचा विवाह होतो. अॅश्टनशी झालेला विवाह हा उमाच्या जीवनातील नावडता, तरी महत्त्वाचा अध्याय आहे. तर दुसर्या बाजूला उमाकडे असलेल्या एका वस्तूमुळे (ज्या वस्तूबद्दल ती स्वत: अनभिज्ञ आहे) तिच्यावर हल्ल्याचे, तिच्या अपहरणाचे प्रयत्न होत आहेत. उमा आणि अॅश्टनचं वैवाहिक जीवन फुलतं का, तिच्याजवळ असलेल्या वस्तूचा शोध तिला लागतो का आणि ती वस्तू कुणाला आणि का हवी असते, याचं काय रहस्य असतं? ऐतिहासिक पार्श्वभूमीवर फुललेली एक हळुवार, रहस्यमय प्रेमकहाणी.