Masurchi Sanjyot (मसूरची संज्योत)
स्वातंत्र्य ही माणसाची सर्वात मोठी गरज आहे. पण कित्येक वेळा, स्वातंत्र्यात जन्मलेल्या माणसाला ते जाणवत नाही. भारत देश पारतंत्र्यात असताना कित्येक लोकांनी त्यांच्या जीवनाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. लाखो लोकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळालं. जे स्वातंत्र्यसेनानी देशासाठी लढले त्यांच्यापुरताच हा लढा मर्यादित नव्हता. या संग्रामामध्ये त्यांच्या घरातील मंडळी, नातेवाईक अशा सर्वच लोकांचं यामध्ये योगदान होतं. हे पुस्तक अशाच एका स्वातंत्र्य सैनिकाची संघर्षमय सत्यकथा आहे. ही कथा कोणा एका व्यक्तीची नसून या संग्रामामध्ये सामील असलेल्या कित्येक लोकांचे प्रतिनिधित्व करते. हे पुस्तक वाचल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जन्मलेल्या प्रत्येकालाच एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. तसेच आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी योगदान दिलेल्या लोकांची परिस्थिती समजायला मदत होईल.