Where Egles Dare (व्हेअर ईगल्स डेअर)

कडाक्याची, गोठवून टाकेल अशी थंडी... अशा थंडीत एका रात्री ब्रिटिश स्पेशल फोर्सेसच्या सात पुरुषांबरोबर एका स्त्रीचा समावेश असलेली टीम जर्मनीतल्या उंच पर्वतराजीच्या प्रदेशात पॅराशूटनं उतरवली जाते... या टीमसमोरचं टार्गेट असतं - ` कॅसल ऑफ द ईगल’ नावाचा, शिरकाव करण्याच्या दृष्टीनं अतिशय दुर्गम, कठीण, अशक्यप्राय आव्हान वाटावं असा एक किल्ला आणि त्यातलं जर्मन सीक्रेट साQव्र्हसचं मुख्यालय... त्यातही या टीमसमोर एक मिशन असतं ते म्हणजे विमान कोसळल्यामुळे नाझींच्या तावडीत सापडलेल्या एका अमेरिकन जनरलची या किल्ल्यातल्या कैदेतून सुटका करणं... त्याची चौकशी करणाऱ्या नाझी अधिकाऱ्यांच्या हातात एक फार महत्त्वपूर्ण अशी गुप्त योजना पडू नये म्हणून... मात्र, ब्रिटिश स्पेशल फोर्सेसचं हे मिशन सुरू झालं नाही तोच या टीमचे सदस्य बळी पडत जातात आणि मिशन गुंतागुंतीचं होत जातं... रहस्यमय, उत्कंठापूर्ण अशा गाजलेल्या चित्रपटाचं उगमस्थान असलेली, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली अ‍ॅलिस्टर मॅक्लिनची एक रोमांचकारक साहसकथा...

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category