Rafinu (राफिणू)

कनसाई गावात होतो कोरोनाचा प्रवेश... त्याच गावातील फिरके गुरुजींचा चुणचुणीत, हुशार, जिज्ञासू मुलगा राजू इतरांसह करतो कोरोनाग्रस्तांना आणि इतर गावकर्‍यांना मदत... आपल्या ड्रोनचा वापर करून तो आजारी लोकांसाठी मागवतो औषधं...शेजारच्या गावातील लाकोंना एका वनस्पतीचा रस घेतल्याने कोरोनापासून मुक्ती मिळाल्याचं समजतं त्याला... शेजारच्या गावातल्या माणसाला मदतीला घेऊन तो जातो ती वनस्पती माहीत असणार्‍या आदिवासींकडे...ती वनस्पती घेऊन त्याचा प्रयोग करतो कनसाई गावातल्या रुग्णांवर आणि ते होतात कोरोनामुक्त...तो आपल्या किरणमामाची आणि त्या आदिवासींची घालून देतो भेट... तेव्हा त्या दोघांनाही कळतं की ते कुणी आदिवासी नसून आहेत परग्रहवासी... परग्रहवासीयांकडून वनस्पती घेऊन डॉक्टर किरण देतात औषध निर्माण करणार्‍या विविध कंपन्यांना...त्यातून वेगळ्या केलेल्या रेणूला नाव दिलं जातं राफिणू (राजू फिरके रेणू)... या कामासाठी राजूचा पंतप्रधानांच्या हस्ते होतो सत्कार...

Book Details

ADD TO BAG