Murtichor (मूर्तिचोर)

तामिळनाडूतील दोन मंदिरांतील धाडसी मूर्तिचोरी प्रकरणी न्यू यॉर्क येथे पुराणवस्तू विक्री करणार्‍या सुभाष कपूर यांचा हात असल्याचं लक्षात घेऊन भारताने त्यांच्या अटकेसाठी काही आठवडे आधी ‘रेड-कॉर्नर-नोटीस’ जारी केली होती. त्यानुसार, यूएस अधिकार्‍यांनी न्यू यॉर्कयेथील कपूर यांच्या वेअरहाउसवर धाड घातली असता मोठं घबाड त्यांच्या हाती लागलं. ‘br>जगातील स कुप्रसिद्ध तस्करांपैकी एक’ अशी यूएसने त्यांची संभावना केली. एक मूर्तिप्रेमी वर्षानुवर्षं कपूरच्या मागावर होता. आजही तो कपूरच्या हातून विकल्या गेलेल्या मूर्तींचा शोध घेत आहे. ही त्यानेच सांगितलेली, अशक्यप्राय वाटणारी सत्यकथा आहे. दक्ष पोलीस ऑफिसर, म्युझियमचे भ्रष्ट अधिकारी, प्रियकराचा सूड घेणारी मैत्रीण, दुतोंडी अभ्यासक, मंदिरात लुटमार करणारे भुरटे चोर आणि तस्कर अशा अनेक व्यक्तिरेखांची या पुस्तकात रेलचेल आहे. भारतीय मंदिरात झालेल्या 21व्या शतकातील या लुटमारीने आणि समाजकंटक गुन्हेगारांच्या धाडसाने थक्क करणारे असे हे पुस्तक आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category