Maharana Pratap Ajey Yodha (महाराणा प्रताप अजेय यो
ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आणि त्याबरोबरच मेवाडी दंतकथा, नोककथा यांच्या आधारावर लिहिण्यात आलेलं, एका अत्यंत महान भारतीय नायकाचं चरित्र. हे सुबोध, सुगम लेखन वाचकांना मंत्रमुग्ध करतं आणि खिळवून ठेवतं. 'सन १५७६ च्या हळदीघाटीच्या प्रसिद्ध लढाईचं वर्णन करताना कुठेही सहानुभूतीनं ओथंबलेलं किंवा पूर्वग्रहदूषित लेखन न करता, राणा प्रतापशी निगडीत असलेल्या अनेक परीकथा दूर सारून अत्यंत प्रामाणिकपणे वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे.' - फ्रंटलाईन 'एका व्यापक ऐतिहासिक चौकटीच्या सादरीकरणातून, महाराणा आणि अकबर या कट्टर शत्रूच्या मनात परस्परांविषयी कितीही शत्रुत्व असलं तरी त्यांना एकमेकांविषयी आदरही होता, हे दाखवून देण्यात आलं आहे.' - स्टेट्समन