Suvarnkan - Bhag 2 (सुवर्णकण - भाग 2)
खरे तर त्या काळात शिक्षकांची आर्थिक स्थितीही हालाखीची असे. अशा काळात संगेवार सर जेव्हा सांगतात, 'मनात प्रश्न साठवून ठेवू नका, शिकवताना काही समजले नाही तर केव्हाही मला विचारा, शाळेनंतर घरी येऊन विचारलेत तरी चालेल.' तेव्हा गणिताची भीती घालवून जगण्याची अगणित जिद्द देणारे संगेवार सर मात्र प्रातःस्मरणीय वाटतात. आज तुलनेने शिक्षकांची स्थिती पूर्वीहून बरी आहे. पण ते समर्पण आज क्वचित दिसते. 'सुवर्णकण' भाग २ वाचताना तो समर्पणाचा परीस आपणास लाभो ही शुभेच्छा! हे पुस्तक कोल्हापूर भागापुरते न राहता सर्वत्र जायला हवे. नेटके व महत्त्वाचे पुस्तक संपादन केल्याबद्दल संपादक डॉ. विजया वाड, शिल्पा खेर आणि मनीषा कदम यांचे अभिनंदन! -- श्री. प्रविण दवणे