Asadharan Hota Hota.. Bhagyashrunkhalanchi Manohar Kahani (असाधारण होता होता... भाग्यशृंखलांची मनोहर कहाणी)
सुखी, आनंदी आयुष्याचं प्रमाण हे दिशादर्शक असतं. 'किती' पेक्षा 'कुठल्या दिशेने' यावर ते अवलंबून असतं. विनोद आलकरी हे पेशाने इंजिनियर असल्यामुळे त्यांना यातील गाभा बरोबर उमजेल. 'टेल्स ऑफ ग्रोइंग लेस ऑर्डीनरी' हे विनोद आलकरी यांचे अनुभव आहेत, मंद गतीने चालणाऱ्या छोट्या शहरातील साधारण आणि मर्यादित आयुष्यातून सुटलेला त्यांच्या करियरचा बाण युनाइटेड नेशन्सच्या जागतिक पदाकडे कसा निर्देशित झाला हे या पुस्तकात अत्यंत रोचकपणे वाचायला मिळते. रिगवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या या इंजिनीयरने आपला प्रत्येक चित्तथरारक अनुभव आपल्यासमोर जिवंत केला आहे. नंतर तो युनिसेफचा अधिकारी या त्याच्या बदललेल्या भूमिकेत आपल्याला भेटतो आणि त्याच्याबरोबर आपण नायजेरिया आणि इराकच्या भूमीत घडलेल्या प्रसंगांमध्ये सामील होतो. कार्लाइल या लेखकाने म्हटल्याप्रमाणे 'जगाचा इतिहास म्हणजे फक्त थोरामोठ्यांच्या चरित्रगाथा!' खरंच असं असतं का ? त्या महान लेखकाची माफी मागून असं म्हणावं लागेल की बऱ्याचदा या गाथा असत्य घटनांनी मढवलेल्या असतात. महानतेचा बुरखा पांघरलेल्या या कथा, 'काय' मिळवलं या विषयाभोवतीच घोटाळत राहतात. ते महान लोक जीवन 'कसं' जगले याचा मागमूसही त्यात नसतो. विनोद आलकरी यांचं 'टेल्स ऑफ ग्रोइंग लेस ऑर्डीनरी' हे कथन या महानतेच्या सापळ्यात न अडकल्यामुळे 'असाधारण' झालं आहे