Rusi Modi The Man Who Also Made Steel
एक अत्यंत संपन्न, अत्यंत सुसंस्कृत कुटुंब. * मुलांचे लाड खूप व्हायचे, पण शिस्तही तितकीच कडक असायची, कपडे साधे असायचे, गरीब मुलांबरोबर खेळायला, खायलाप्यायला सूट असायची. * असं ठासून मनावर बिंबवलं जायचं, की गरिबी, मळके कपडे यात लाजिरवाणं काहीही नाही; खोटं बोलणं, वाईट वागणं हे लाजिरवाणं आहे. * शिक्षण इंग्लंडमध्ये हॅरो आणि ऑक्सफर्डला. बुद्धी तल्लख, पण अभ्यासाची आवड नाही. लक्ष पाट््र्या, डान्सेस, मौजमजा यांमधे इतिहास विषयात स्नातक. * इतिहास राहिला बाजूला, नोकरीला लागले एका मोठ्या कारखान्यात रोजावर मजूर म्हणून! * कष्ट करण्याची तयारी, माणसांना समजून घेणं, माणसं जोडता येणं, सवा|शी मिळतं घेणं हे खास विशेष गुण. शिस्तीचे आग्रही. वेळ पडली तर वज्रादपि कठोराणी एरवी मृदूनि कुसुमादपि! * उत्तम कलांची आवड, उत्तम खाण्याची, पिण्याची, संगीताची, पाश्चिमात्त्य नृत्याची जाण व आवड. उत्तम वक्ते, भरपूर वाचन, कारकिर्दीत प्रचंड प्रगती. ........सगळंच छान? दु:ख कशाचंच नाही? आहे ना! पण त्याचं प्रदर्शन नाही. * सुंदर, गुणी मुलीशी प्रेमविवाह केला, पण चौदा वर्षानंतर घटस्फोट झाला तरीही तिच्याशी संबंध अजून छान! * मुलांची खूप आवड, पण मूलबाळ नाही! "...सगळ्यांनाच सगळंच कसं मिळेल?'' * नोकरीत अन्याय झाला दुसरी कंपनी काढली! इतकी बहुरंगी, बहुढंगी अशी आहे तरी कोण ही आगळीवेगळी विलक्षण व्यक्ती? * ज्यांनी जमशेटपूरच्या टिस्कोमध्ये एकूण त्रेपन्न वर्ष सलग काम केलं, त्यातली नऊ वर्ष अध्यक्ष व प्रमुख संचालक म्हणून काम करून कंपनीची विक्री व नफा प्रचंड प्रमाणात वाढवला, ते आता नत्वदी पार केलेले, तरीही कामात त्यग्र असलेले आणि मजेत जगणारे, हे आहेत रुसी मोदी!