Walt Disney (वॉल्ट डिस्ने)

By (author) Yashwant Ranjankar Publisher Rajhans Prakashan

वॉल्ट डिस्ने! मिकी माउस, डॉनल्ड डक या आणि अशाच असंख्य पात्रांची निर्मिती करून जगभरातल्या माणसांना कल्पनारम्य जगातली सफर घडवून आणणारा अवलिया. वरवर हास्यास्पद वा अशक्यप्राय घटनांकडेही तो गांभीर्याने पाही. ''अरे, एखादी कल्पना जन्माला आली, की लागलीच तिला मारून टाकण्याची घाई करू नका रे!'' - असं म्हणणारा आणि म्हणूनच स्वप्नदुलर्भ अशी स्वप्न पाहाणारा तो महान द्रष्टा कलावंत ठरला. चित्रकार, व्यंगचित्रकार, अॅनिमेटर, कार्टून लघुपटकार, कार्टून्समध्ये रंग भरणारा आणि त्यांना ध्वनीची जोड देणारा, पूर्ण कार्टूनपट प्रथम निर्माण करणारा इथपासून ते डिस्ने लॅण्डचा निर्मितीकार इथपर्यंत अदम्य प्रवास करणार्‍या या अफलातून माणसाचं चरित्र!

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category