U Only Live Twice
द टाइम्स' मध्ये मृत्युलेख लिहिताना 'एम्'नी लिहिलं : "कमांडर जेम्स बाँड हे जपानला शासकीय कामगिरीवर असताना ठार झाल्याचे समजते. ते वाचले असण्याची आशा आता सोडून द्यायला हवी ..." कमांडर बाँड म्हणजे जेम्स बाँड. प्रसन्न, मोहक व्यक्तिमत्त्वाचा, सुसंस्कृत, देखणा, थंड, निर्दयीपणाने शत्रूचा समाचार घेणारा; अतिशय धोकादायक ब्रिटिश सीक्रेट एजंट. अन्स्र्ट स्टावरो ब्लोफेल्ड. बुद्धिमान पण सैतानी, विकृत मनोवृत्तीचा शास्त्रज्ञ. सा-या जगाच्या सुरक्षिततेला वेठीस धरणारा. ब्लोफेल्डचे दोन प्रकल्प बाँड उद्ध्वस्त करतो, म्हणून त्याच्या पत्नीची ब्लोफेल्ड हत्या घडवतो. मनानं खचलेल्या बाँडची कारकीर्दच संपुष्टात येऊ पाहते. पण 'एम्' त्याला ह्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून जवळपास अशक्यप्राय अशा जपानच्या कामगिरीवर पाठवतात. बाँडचा तिथल्या एका गूढ वास्तूत 'मृत्युदुर्गात' प्रवेश होतो. आणि त्याची गाठ पाडते त्याच्या जुन्या शत्रूशी ! दोन वेळा तावडीतून सुटलेल्या अन्स्र्ट स्टावरो ब्लोफेल्डशी ! आता मात्र शेवट अटळ आहे. कुणाचा ? एम् नी म्हटल्याप्रमाणे बाँडचा...