Franklin Roozvelt
1928च्या त्या काळया गुरूवारी अमेरिकेतील शेअरबाजार साफ गडबडला, पार कोसळलाच! उद्योगधंदे ठप्प. बँका बंद. महामंदीचे सावट. प्रचंड बेकारीचे अरिष्ट. जनता पुरती हवालदिल.त्या अंधारलेल्या वातावरणात एका पोलियोग्रस्त नेत्याने देशाला दिलासा दिला. चाकोरीबाहेरचे नवे धोरण आखले. सर्व थरांतील बेकारांना हाताशी धरून त्याने असंख्य प्रकल्प उभारले. अर्थव्यवस्थेला चालना दिली आणि देशाचा कायापालट घडवला. एक संकट निवारले जाते आहे, तोच दुसरे महायुध्द समोर उभे ठाकले. तो डगमगला नाही. हुकुमशहांच्या विरोधात तो उभा ठाकला. त्यांचा नि:पात करून त्याने जागतिक शांततेचा पाया रचला. चार वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवणारा तो एकमेव नेता ठरला.फ्रँकलिन डिलॅनो रूझवेल्ट हे त्याचे नाव. अमेरिकेचा तारणहार ठरलेल्या त्या जिद्दी नेत्याची ही यशोगाथा!