-
Drive (ड्राईव्ह)
कौशल्य, स्वायत्तता आणि उद्देश ही प्रेरणेची तीन तत्त्वं आहेत. ड्राइव्ह पुस्तकामधे या तीनही तत्त्वांचं सखोल विश्लेषण केलेलं आहे. तसंच यांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी स्मार्ट तंत्रं सांगितलेली आहेत. बहुतेक लोकांचा असा समज आहे की, लोकांना प्रोत्साहन देण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना पुरस्कार देणे किंवा शिक्षा देणे. बेस्टसेलर लेखक डॅनियल एच. पिंक असं म्हणतात की, हा दृष्टिकोन चुकीचा आहे. 1) प्रेरणेतील प्रगती आणि अधोगती 2) बक्षीस आणि शिक्षेचा उपयोग न होण्यामागील तीन कारणे 3) आंतरिक प्रेरणा 4) आय आणि एक्स प्रेरणा 5) प्रेरणा जागृत करण्याच्या नऊ पद्धती 6) पालक-शिक्षकांनी मुलांना प्रेरणा कशी द्यावी 7) व्यायाम सुरू करण्यासाठी आणि 8) चालू ठेवण्यासाठी युक्त्या
-
Build The Life You Want (बिल्ड द लाईफ यू वॉन्ट)
या पुस्तकात मला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. मला आशा आहे की, तुम्हीदेखील त्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहाल. म्हणजे एक अशी खऱ्या अर्थी आनंदी व्यक्ती पाहाल, जी तुम्ही बनू शकता. आर्थरने या पुस्तकात मांडलेल्या तत्त्वांचे मी पालन करते आणि त्यामुळे मी अधिकाधिक आनंदी होत चालले आहे. मला खरंच मजा येत आहे. मला हे पक्कं माहिती आहे की, जेव्हा आपण दुसऱ्यांना आनंद देतो तेव्हा तो वाढतो. हे पुस्तक तुम्हाला आनंद स्वीकारण्याचं आणि तुमचा आनंद इतरांनाही वाटण्याचं स्मरण देत राहील. ओप्रा विन्फ्रे या पुस्तकात... आनंद म्हणजे काय? भावनांचं व्यवस्थापन मेटाकॉग्निशनची शक्ती आपला नावडता भूतकाळ परत कसा लिहावा? उद्देश्य असलेलं आणि अर्थपूर्ण जीवन जे खरोखरच महत्त्वाचं आहे ते घडवणे
-
Level Up (लेव्हल अप)
‘लेव्हल अप’ हे पुस्तक तुमच्या आयुष्याप्रती आणि ध्येयांप्रती असलेल्या दृष्टिकोनात क्रांतिकारी बदल घडवेल. “आत्तापर्यंत रॉब डायलच्या प्रशिक्षणाने लाखो लोकांना त्यांची मानसिकता बदलवण्यास आणि ध्येय प्राप्त करून देण्यास मदत केली आहे. ‘लेव्हल अप’ हे पुस्तक वाचून तुम्हालाही समजेल की, तुम्हाला हवं असणारं आयुष्य कसं मिळवायचं.” - हाल एलरॉड ‘दि मिरॅकल मॉर्निंग’ या पुस्तकाचे लेखक. “उज्ज्वल भविष्याची गुरूकिल्ली.” - लेविस होवेस ‘द ग्रेटनेस माईंड सेट’ या पुस्तकाचे लेखक. या पुस्तकात… तुम्ही कृती का करत नाही? कृती करण्यासाठी स्वतःला कसं भाग पाडावं? सवयी निर्माण कशा कराव्यात आणि त्यावर कसं टिकून राहावं? भीतीचे प्रकार आणि त्यांची वास्तविकता कार्यक्षमतेचं रहस्य – एकाग्रता मेंदूत बदल घडवून आणणारं शास्त्र चित्त एकाग्र करणे, प्रोत्साहन मिळवणे यामागचे शास्त्रीय सिद्धांत
-
How To Know A Person (हाऊ टू नो अ पर्सन)
या पुस्तकाचे लेखक डेव्हिड ब्रुक्स म्हणतात, ‘वय वाढतंय, तसं मला एका गोष्टीची जास्तीत जास्त खात्री वाटायला लागली आहे की, कोणतंही समतोल कुटुंब, कंपनी, वर्ग, समाज किंवा राष्ट्र यांच्या केंद्रस्थानी एकच कौशल्य असतं : ते म्हणजे, एकमेकांना जाणून घेण्याची क्षमता. समोरच्याला आपली किंमत केली जात आहे, आपलं कोणीतरी ऐकून घेतंय आणि आपल्याला समजून घेतलं जातंय असं वाटायला लावणं.’ घर, ऑफिस आणि समाजात तयार होणारी नाती आयुष्यभरासाठी कशी दृढ करायची, समोरच्याला खऱ्या अर्थानं कसं जाणून घ्यायचं? हे सांगणारं आणि सहज अमलात आणता येण्याजोगं पुस्तक. या पुस्तकात... दखल घेण्याची ताकद समोरच्याला समजून घेताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात ? अवघड परिस्थितीत कसं संभाषण करावं ? निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मित्राला कशी मदत करावी ? संघर्ष तुमच्या जीवनाला कसा आकार देतो? तुम्ही तुमच्याबरोबर कोणती ऊर्जा घेऊन येता?
-
The Happiness Story (द हॅप्पीनेस स्टोरी)
सर्वोत्तम जीवन जगण्याचं रहस्य उलगडणारं पुस्तक - आनंद हे दूरचे स्वप्न नसून तुमच्या आवाक्यात असलेली निवड आहे. भीतीदायक जगामुळे निराश होण्याची गरज नाही. कारण त्याचा सामना करण्याचा प्रभावी मार्ग उपलब्ध आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला तो मिळवता येईल. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आवडी जोपासण्यासाठी, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी, स्वतःचं नशीब स्वतःच लिहिण्यासाठी प्रेरित करेल. परिस्थिती काहीही असो, या पुस्तकात दिलेले व्यावहारिक सल्ले तुम्हाला दररोज आनंद आणि शांततेचा अनुभव देतील. 1) आपली दैनंदिन जीवनशैली कशी आखावी ? 2) स्वतःची काळजी घेणं 3) कृतज्ञता 4) इच्छा-आकांक्षा आणि यातना यांचं चक्र 5) आनंदाच्या बाबतीतलं सत्य 6) स्वतःच्या बाबतीतली जागरूकता
-
You Happier (यू हॅपिअर)
न्यूयॉर्क टाईम्सचे बेस्टसेलिंग लेखक डॉ. डॅनिअल आमेन यांनी न्यूरोसायन्सच्या सात रहस्यांचा उलगडा केला आहे. या रहस्यांच्या माध्यमातून एखादी व्यक्ती 30 दिवसांमध्ये 30 टक्के जास्त आनंदी राहू शकते. तुमचं वय किती आहे, तुमची वाढ कशा पद्धतीने झाली आहे, तसंच तुमची आनुवंशिक वैशिष्ट्ये किंवा तुमचा वर्तमान कसाही असला तरीही ही रहस्यं तुम्हाला आनंदी राहण्यात मदत करतात. b. आनंद हे मेंदूचं कार्य आहे. जर मेंदू निरोगी असेल तर आयुष्य आनंदाने जगता येऊ शकतं. डॉ. आमेन यांनी 155 देशांमधील 200000 पेक्षाही जास्त मेंदूंच्या स्कॅन्सचा अभ्यास केला. त्या अभ्यासाद्वारेच त्यांनी आनंदासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या मेंदूच्या पाच प्राथमिक प्रकारांचा आणि न्यूरोसायन्समधील सात रहस्यांचा शोध लावला. ‘यू हॅपिअर’मध्ये त्यांनी याची सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही आनंदी होण्यासाठी यात काही शास्त्रशुद्ध आणि व्यावहारिक उपाय सांगितले आहेत. जसे की : 1) तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार तुमच्या मेंदूचा प्रकार कसा ओळखायचा आणि स्वतःसाठी उपयुक्त असलेले आनंदी होण्यासाठीचे उपाय कसे करायचे 2) स्वतःची मनःस्थिती सतत चांगली ठेवण्यासाठी स्वतःच्या मेंदूचे सर्वांगीण आरोग्य कसे सुधारायचे 3) मेंदूत सुरू असणाऱ्या गोंधळापासून स्वतःला वेगळे करून स्वतःच्या आनंदाचे रक्षण कसे करायचे 4) स्वतःच्या आनंदात वाढ करण्यासाठी घ्यायचे सात सोपे निर्णय आणि विचारायचे सात प्रश्न कोणते c. स्वतःचा आनंद सतत कायम ठेवणं हा एक रोज चालणारा प्रवास आहे. ‘यू हॅपिअर’मध्ये डॉ. आमेन तुम्हाला न्यूरोसायन्सवर आधारित काही सवयी, पद्धती आणि पर्यायांबद्दल सांगतात. यामुळे तुमची मनःस्थिती तर चांगली राहतेच, शिवाय तुम्ही रोज स्पष्टपणे ठरवलेली मूल्ये, उद्देश्य आणि ध्येयांवर आधारित आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होते.
-
Gunhyachya Paulkhuna (गुन्ह्याच्या पाऊलखुणा)
प्रत्येक गुन्हेगार काही पुरावे मागे सोडून जातो. कधी ते चटकन सापडतात तर कधी पुरावे सापडायला काही वर्ष ही लागतात. सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध करण्यासाठी आणि गुन्हेगाराची ओळख निःसंशय पटवून देण्यासाठी न्यायव्यवस्था ज्या विज्ञानाचं सहाय्य घेते त्याला न्यायसाहाय्यक विज्ञान असं म्हणतात. चित्रपट आणि टी वी सीरियल्स मधून न्यायसाहाय्यक विज्ञानाची तोंड ओळख झाली असेलच. या पुस्तकात न्यायसाहाय्यक विज्ञानाची सखोल माहिती आणि फॉरेंसिक सायन्सच्या उपयोगाने सोडवलेल्या काही थरारक क्रिमिनल केसेस आहेत. विविध शास्त्र जसे की रसायनशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र यांचा उपयोग न्याय दानासाठी केला जातो. क्राईम सीन पासून न्यायालयापर्यंतचा पुराव्यांचा प्रवास सोप्या भाषेत वर्णन करण्याचा हा प्रयत्न आहे. विविध टेक्नॉलॉजी आणि उपकरणांची उपयोग गुन्हे तपासासाठी केला जातो. या सगळ्याची नेमकी माहिती या पुस्तकात मिळेल. हस्ताक्षर, स्वाक्षरी, बोटांचे ठसे यांचा अभ्यास कसा केला जातो. लाय डिटेक्टर टेस्ट, नार्को टेस्ट डीएनए प्रोफाइलिंग अश्या ऐकीवातल्या तंत्रज्ञानाची माहिती या पुस्तकात आहे. न्यायवैद्यक शास्त्र आणि त्याच्या विविध शाखांची ओळखही तुम्हाला या पुस्तकातून होईल. सायबर गुन्हे आणि त्यांचा तपास करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर/ हार्डवेअर यांची ही थोडक्यात माहिती मिळेल. सत्य हे कल्पनेपेक्षा आश्चर्यकारक असतं या वाक्प्रचाराची अनुभूती देणारे गुन्हे आणि त्यांचा फॉरेंसिक सायन्स च्या मदतीने केलेला उलगडा या पुस्तकात आहे. फॉरेंसिक सायन्स चे विद्यार्थी, तपास कार्य करणारे अधिकारी व एक्सपर्ट्स, न्यायाधीश व वकील, थ्रिलर कथा लिहिणारे लेखक आणि फॉरेंसिक सायन्स व गुन्हे तपास या विषयाचे कुतूहल असलेल्या सर्व वाचकांना हे पुस्तक वाचायला आवडेल.
-
Big Bang Vishwaprarambhache Thararnatya (बिग बँग विश्वप्रारंभाचे थरारनाट्य)
या अथांग विश्वाचा प्रारंभ कसा झाला ? विश्वाच्या प्रारंभाचा शोध घेण्याचं वेड शास्त्रज्ञांना कसं लागलं ? विश्वाच्या प्रारंभाचे पुरावे माणसानं कसे शोधले ? या पुस्तकात उलगडेल विश्वप्रारंभाची शोधकथा.. थक्क करणारा विश्वप्रारंभाचा थरार आणि त्याचा शोध घेताना शास्त्रज्ञांनी केलेली अचंबित करणारी धडपड जाणण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा ! सुर्यासारख्या अब्जावधी ताऱ्यांनी बनणाऱ्या गॅलेक्सीज आणि अशा अब्जावधी गॅलेक्सीजनं बनलेलं विश्व पाहिलं की अक्षरशः थक्क व्हायला होतं. या अथांग विश्वाच्या प्रारंभाचा माणसानं घेतलेला शोध हा एखाद्या उलगडत जाणाऱ्या रहस्यकथेसारखा आहे. 'बिग बँग' ही विश्वाच्या प्रारंभाची शोधकथा आहे. रात्रीच्या आकाशातल्या चांदण्यांचं निरीक्षण करायचं आणि गणित, विज्ञानातले नियम वापरत निव्वळ तर्काच्या आधारावर विश्व कधी आणि कसं निर्माण झालं याचा शोध घ्यायचा म्हणजे माणसाची एक उत्तुंग झेप आहे ! या शोधकथेत एकामागोमाग एक झपाटलेले शास्त्रज्ञ येतात आणि विश्वाच्या निर्मितीच्या रहस्यांचा उलगडा करताना दिसतात.
-
Aadim Dukhhache Vartul (आदिम दुःखाचे वर्तुळ)
लोकगीतांची शब्दकळा स्वतःमध्ये मुरवून घेऊन आधुनिक युगातील जगण्याचा वेध घेणारी सशक्त कविता भारती पाटील यांच्या 'आदिम दुःखाचे वर्तुळ' या संग्रहातून भेटते. ग्रामजीवनातील चैतन्याने रसरसलेल्या जगण्याबरोबरच तिथले दुःख-दैन्य कवेत घेणारी ही कविता मनाचा ठाव घेते. कोणतीही चांगली कविता वाचकांना आपल्या गद्य जगण्यापलीकडच्या भावविश्वात सहजपणे घेऊन जात असते. भारती पाटील यांची कविता त्या निकषावर अस्सल ठरते. घासातला घास खाऊ म्हणताना कुणीही परका नसल्याचे सांगताना ही कविता माणसांमाणसांमध्ये उभ्या केल्या गेलेल्या सगळ्या भिंतींना पार करून जाते.