-
Ayushyacha Nava Dav (आयुष्याचा नवा डाव)
नैराश्य ही सबंध जगाला भेडसावणारी समस्या. दर चार व्यक्तींमागे एक व्यक्ती नैराश्याने ग्रासलेली असते. नैराश्यातनं होणाऱ्या आत्महत्यांमध्ये भारत जगात आघाडीवर आहे. पण तरी मानसिक आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोललं जात नाही. हे पुस्तक नैराश्यासारख्या महत्त्वपूर्ण विषयावरचं आपलं मौन सोडायला लावतं. डॉ. शैलजा सेन यांचा मानसिक आरोग्यातला प्रदीर्घ अनुभव, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनुभवलेल्या केसेस गोष्टरूपात या पुस्तकात समोर येतात. या गोष्टीतून आणि रूग्णांसोबतच्या त्यांच्या संवादातून प्रत्येकाला आपल्या मानसिक दुखण्यावरही इलाज सापडत जातो. मानसिक अनारोग्याबाबतची लांच्छनाची भावना, लाज यांच्याविरोधात आवाज उठवत हे पुस्तक तुम्हाला समजून घेणारी मैत्री बहाल करतं.
-
Mahaparva.. (महापर्व)
मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचा सुसूत्र लेखाजोखा. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य संभाजी महाराजांच्या वधानंतर मोगल आपल्या घोड्यांच्या टापांखाली तुडवत होते. औरंगजेब आणि त्याचे प्रचंड सैन्य मराठ्यांना चिरडू पाहत होते. सुमारे पंचवीस वर्षांहून अधिक काळ औरंगजेब आणि त्याच्या सैन्याला झुंजवणाNया राजाराम महाराज, संताजी-धनाजी, ताराबाई आणि अन्य अनुभवी मराठी सरदारांची शौर्यगाथा.
-
Shanghayachya Muli (शांघायच्या मुली)
शांघाय शहरातील पर्ल व मे या दोघी तरुण बहिणी... जुगारात हरल्यानंतर त्यांचे वडील या दोघींनाही लॉस एंजलिसला स्थायिक झालेल्या लुई नावाच्या मूळ चिनी माणसाच्या दोन मुलांच्या वधू म्हणून विकतात...त्या दोघींचा चीन ते अमेरिका असा खडतर प्रवास, लुईच्या कुटुंबात गेल्यानंतरचं त्यांचं आयुष्य आणि कालांतराने परिस्थितीवश या दोघींमध्ये उभी राहिलेली भिंत...स्थलांतराच्या अनेक पैलूंचं दर्शन घडवणारं, मनाला चटका लावणारं भावनाट्य
-
Gahan Padleli Tekadi (गहाण पडलेली टेकडी)
गहाण पडलेली टेकडी हा आदिवासी स्त्रियांच्या कहाण्यांचा संग्रह. या कहाण्या मारिजा स्रेस यांनी त्या अदिवासींमध्ये त्यांच्यापैकी एक होऊन, त्यांच्यात राहून लिहिल्या आहेत. ‘इथं तर हे नेहमीचंच’ या कथेतील मुकादम आणि ठेकेदाराच्या पाशवी वासनेला बळी पडून जीव गमवावी लागलेली नुकतीच वयात आलेली लाली...‘ठेवलेली बाई’ कथेतील पहिला नवरा गेल्यावर नाईलाजाने दुसरं लग्न करावं लागलेली आणि दुसऱ्या नवऱ्याने बाई ठेवली आहे, हे कळल्यावर बंड करू पाहणारी खातरी...‘दुभती गाय’ कथेतील आदिवासी स्त्रियांना हाताशी धरून गावात दूध सोसायटी उभी करू पाहणाऱ्या मीराबेनला पुरुषी मानसिकतेचा करावा लागणारा सामना...‘जो मैं ऐसा जानती’ कथेतील तारुण्यात पाय घसरलेली, पण नंतर नेकीने संसार करणारी मकू...‘बदलत्या काळाची पावलं’मधील ठार मारू पाहणाऱ्या नवऱ्याच्या आणि सासरच्या लोकांच्या तावडीतून सुटून आलेली, नंतर नानजीशी लग्न करून सुखाचा संसार करताना गावातील बायकांचा उद्धार करू पाहणारी फूली...काही शोषित आणि काही संघर्ष करू पाहणाऱ्या आदिवासी स्त्रियांचं वास्तव विश्व.