-
Man Main Hai Vishwas (मन में है विश्वास)
ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक 'एकलव्यां'ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.
-
Vijay Stambh (विजय स्तंभ)
रामायणप्रसाद वडिलांचा फोटो घेऊन बसे.वेगवेगळ्या कोनातून फिरवून बगत राही.अस्पष्टशी आकृती वरच्या बाजूला वळलेल्या आकडेबाज मिश्या स्पष्ट दिसत .तो फोटो कधी काळी स्पष्ट सुंदर असावा. थोडा आईच्या अश्रूंनी अस्प्ष्ठ केला व थोडा विजयस्तंभाच्या प्रभावाने. त्याने कल्पनेत जेव्हा जेव्हा वडिलांचा चेहरा पहिला , त्याचा डोळयासमोर विजयस्तंभ येउन उभा राहिला. आजोबांबरोबर विजयस्तंभाजवळ जाऊन तो विचारीत असे, "आजोबा , तुम्हांला असे नाही वाटत की हा विजयस्तंभ माझे बाबा आहेत . यांना एक धड आहे, एक चेहरा आहे, धडाला हातपाय नाहीत आणि चेहऱ्यावर नाकडोळे नाहीत ."