-
Mantrajagar (मंत्रजागर)
वेगळ्या आणि अद्भुत वाटा चोखाळणार्या अरुण साधू यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कथा. पण वेगळ्या तरी कसे म्हणता येईल ? कारण मानवी संस्कृतीला लागलेली विकृतीची कीड, आण्विक प्रलय, मराठी भाषेची दुर्दशा हे विषय साधूंनी यापूर्वीही आपल्या कथा-कादंबर्यामधे हाताळले आहेत. किंबहुना या विषयांनी लेखकाला झपाटले आहे. व्यापक सामाजिक व मानवी आशय असलेल्या व भविष्यात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करणार्या या अद्भुत विज्ञानकथा अथवा फॅन्टसीज् आहेत असे म्हणता येईल. साधू यांच्या खास सहज शैलीतील.
-
Goldfinger (गोल्डफिंगर)
जेम्स बँड ००७ वास्तव वाटावीट अशी आजही जगावर अधिराज्य गाजविणारी व्यक्तिरेखा... सौंदर्यवतींना रमवणारा आणि खलनायकांना ठेचणारा हिकमती योद्धा, हेर... 'गोल्ड फिंगर' या स्न्श्यास्प्द असमीचा वेध घेण्याची कामगिरी बॉंडवर सोपवली जाते... रहस्याचे धागे उलगडू लागतात... गोल्ड फिंगरला सोन्याचं वेड तर असतंच; पण त्याचं असं सोनेरी साम्राज्यचं असतं... इयान फ्लेमिंगच्या कल्पनेतल्या रंगमंचावर अमानुष ऑडजॉब, उन्मादक जिल, गूढ टिली, आक्रमक-अजब पुसी गॅलोर आणि अनेक घातकी, गुन्हेगारी व्यक्तिरेखा अवतरतात.. मृत्युदाता गोल्डफिंगरचं संधान टस्मर्श्ङ या रशियाच्या खुनशी हेर संघटनेशी तर असतंच, पण् त्यनं एक महाकारस्थानही आखलेलं असतं... मोठ नरसंहार होईल, अमेरिका हादरून जाईल एवढं भयावह... आजच्या अतिरेकी कारवायांशी नातं सांगणारं... ही आपत्ती टाळणं शक्य असतं फक्त जेम्स बॉंडला ! शह-काटशह, कपट-करस्थानं, अंधारातल्या कारवाया, पाठलाग, कलाटण्या, रहस्यानं भरलेलं आणि तरीही एक हेरकथेला शैलीदार परिमाण देणारं दमदार बॉंड नाट्य... 'गोल्ड फिंगर'.
-
Phiruni Navi Janmale Mi (फिरुनी नवी जन्मले मी)
अरुणिमा सिन्हाची प्रस्तुत आत्मकथा कल्पित वाटावी अशी एक चित्तथरारक कहाणी आहे. शीर्षकात म्हटल्याप्रमाणे याच जन्मी झालेल्या पुनर्जन्माची ती चित्तरकथा आहे ! हलाखीत असलेल्या कुटुंबातील ही पितृहीन युवती औद्योगिक सुरक्षा दलात हेडकॉन्स्टेबलच्या जागेसाठी मुलाखतीला म्हणून रेल्वेनं लखनौहून दिल्लीला जायला निघते. खचाखच भरलेल्या अनारक्षित डब्यात ऐन मध्यरात्री गळ्यातल्या सोन्याची चेन हिसकावणाऱ्या गुंडांशी झटापट होऊन ती बाहेर अंधारात फेकली जाते. तिच्या दुर्दैवानं त्याच वेळी उलट दिशेनं येणाऱ्या गाडीखाली येऊन ती आपला पाय गमावते. यातून ती कशीबशी बचावते. त्याही हतबल, अपंग स्थितीत आपल्या कृत्रिम पायानिशी हिमालयचं एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न मनात बाळगते, आणि नंतर अवघ्या दोन वर्षात ते खरोखरच गाठून तिथवर पोचणारी जगातली पहिली अपंग स्त्री म्हणून ख्यात होती. 'पडेन पण पडून राहणार नाही ' हे त्यातलं निश्चयी अध्यात्म सर्वांना धडा आणि प्रेरणा म्हणून मोलाचे आहे.
-
Te Aani Mi (ते आणि मी)
शकुंतला पुंडे यांच्या ललित लेखांचं हे पुस्तक. पुण्यासारख्या शहरातील अनुभव, कोकणातील निसर्ग याबद्दल त्यांनी खूप जिव्हाळ्याने लिहिले आहे. शहरातील घराच्या गॅलरीबाहेरचा हिरवा रंगमंच असो किंवा कोकणातील मुक्त घनदाट विस्तीर्ण निसर्ग या साऱ्याबद्दल पुंडे वाचकांशी संवाद साधत सोप्या शब्दांत आणि ओघवत्या भाषेत लिहितात. पुस्तकात चारच प्रकरणे आहेत; पण यातून खूप मोठा पसारा आपल्यासमोर उलगडला जातो. केवळ माहिती न देता त्या भाष्यही करतात. त्यामुळे पुस्तक आणखीनच वाचनीय झाले आहे.