-
Shivachi Saat Rahasye (शिवाची सात रहस्ये)
शिवशंकराच्या कहाण्या, चिन्हे आणि कर्मकांड यांमध्ये आपल्या पूर्वजांची रहस्ये बंद आहेत. त्यांपैकी सात रहस्यांचा उलगडा करण्याचा प्रयन्त देवदत्त पट्टनायक यांनी या पुस्तकातून केला आहे. पाहिल्या प्रकरणात शिवलिंगाचा खरा अर्थ सांगितला आहे. दुसऱ्या प्रकरणातून मानवसमूहाच्या प्रादेशिक वर्तणुकीबद्दल शिवाला वाटणारा संताप व तिरस्काराबद्दल लिहिले आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रकरणात शिवला जगाकडे दयार्द नजरेने पाहायला देवी कसे शिकवते याबद्दल माहिती आहे. पाचव्या व सहाव्या प्रकरणात शिवाचे दोन पुत्र गणेश व मुरुगन यांच्यासंबधात माहिती आहे, तर अखेरच्या प्रकरणात शिव नृत्यकलेमधून ज्ञानप्रदान करणारा जाणकार शिक्षक कसा आहे, ते सांगितले आहे.
-
Tin Dagadachi Chul (तीन दगडाची चूल)
2001सालातील लक्ष्मीबाई टिळक राज्य पुरस्कार तसेच भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार यासारख्या सन्माननीय पुरस्काराने गौरवलेले हे पुस्तक वाचकाला अस्सल जीवनानुभवाचा प्रत्यय देते. भटक्या विमुक्त जमातींच्या अपार दु:ख, दैन्य, हालअपेष्टांची ओळख करून देणारे हे पुस्तक. गावोगाव भटकणार्या कुटुंबातील दारिद्र्यात होरपळणार्या मुलीचा विवाहानंतर समाजकार्यकर्ती म्हणून घडलेला विकास, त्याचा प्रवास हा या पुस्तकाचा सशक्त गाभा. नवा जीवन संस्कार घडवणारं मौलिक आत्मकथन.
-
Vishnuchi Saat Rahasye (विष्णूची सात रहस्ये)
हिंदू धर्मात भगवान विष्णू हा देव केंद्रस्थानी आहे. सृष्टीचे नियमन करणाऱ्या विष्णूबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. विष्णूची प्रतीके व संस्काराच्या कर्मकांडाबद्दल सातत्याने सांगितले जाते. जगाच्या कल्याणासाठी जे नऊ अवतार होऊन गेले ते विष्णूचेच असल्याचे मानले जाते. विष्णू देवतेचे महत्व, कथा, प्रतीके, त्याचे संसारी रूप देवदत्त पटनायक यांनी 'विष्णूची सात रहस्ये 'मधून उलगडली आहेत. यात विष्णू, ब्रह्मा, इंद्र या देवांची निर्मिती, त्याच्या मानवाशी निगडीत संदर्भ दिले आहेत. नारदाची जन्मकथाही आहे. विष्णूचे मत्स्य, कूर्म, वामन, नरसिंह, राम, कृष्ण आदी अवतार, त्यांची कथा, त्यांचे कार्य, मनुष्याची निर्मिती, त्यांच्या मदतीसाठी धावून आलेला विष्णू, माणसांमध्ये पूजल्या जाणाऱ्या विष्णूची विविध रूपे, बलरामाचे महत्त्व, शुभ्र घोड्यावर बसलेला आणि हातात तलवार घेतलेला योद्धा म्हणजे साऱ्या गोष्टींचा नाश करणारा विष्णूचा कल्की अवतार व या सर्वांचे मनुष्याच्या आयुष्याशी व वर्तनाशी जोडलेला संबंध यांचे रहस्य आपल्यापुढे यातून मांडले आहेत.
-
A.P.J.Abdul Kalam Ek Vyaktivedh (ए.पी.जे. अब्दुल क
विख्यात अणुशास्त्रज्ञ! भारतीय क्षेपणास्त्रांचे शिल्पकार! भारताचे राष्ट्रपती!
-
Mendhpal Pravas Na Sampanara (मेंढपाळ प्रवास न संप
प्रा. ब . स. मंचरे. … मेंढपाळांच्या प्रवासाने गांव संपतात पण वाटा संपत नाहीत. कधी संपेल यांची भटकंती यांना मिळतील का हक्काची घंर जगायला अन्नपाणी आणि लेकरांना शिक्षण हा प्रश्न माझा नाही , तुमचाहि नाही हा प्रश्न आहे तमाम मेंढपाळांचा जिणं जगणाया शेषीतांचा...
-
Octopussy (ऑक्टोपसी)
एम्ने थंडपणे टेबलापलीकडे दृष्टी टाकली. हे एक निष्ठुर काम असणार होतं आणि बॉंड डबल ओ सेक्शनमध्ये असल्यामुळे त्या कामासाठी त्याची निवड झाली होती. "या लपून गोळीबार करणार्या सैनिकाला तू ठार केलंच पाहिजे, आणि तेही त्याने एजंट २७२ ला टिपण्याआधी. नीट समजलास नं ?" म्हणजे, हा चक्क खून होत तर... जेम्स बॉंड, ब्रिटिश गुप्तहेर ००७, याला आंतरराष्ट्रीय हेरगिरी करताना अशीच निर्दय कामे करावी लागत. कॅरिबियनला स्वत:बरोबर भयंकर रहस्य नेणार्या द्वाड मेजरला शोधणे असो, सोदेबीच्या लिलावाच्या दालनात फॅबर्जेच्या अंडाकृतीला गुप्तपणे बोली बोलणारा रशियन गुप्तहेर ओळखून काढणे असो, किंवा पूर्व व पश्चिम बर्लिनमधील गल्लीत लपून गोळीबार करणार्या सैनिकाने अत्यंत निर्घृणपणे एका असंभाव्य मारेकर्यावर गोळ्या झाडणं असो, बॉंड नेहमीच आपली भूमिका योग्य प्रकारे बजावतो. ००७ च्या गुप्त रिपोर्टबद्दल पूर्ण माहिती असलेल्या अधिकार्याप्रमाणे इयान फ्लेमिंग, एकमेकांविरुद्ध करण्यात येणार्या गुप्त हेरगिरीच्या क्लिष्ट प्रकरणांचा छडा लावतो !
-
Diamonds Are Forever (डायमंड्स आर फॉरएव्हर)
टिफानी म्हणाली, "हे बघ बाँड, मला बेडमध्ये यायला राजी करण्यासाठी क्रॅबमीट रेविगोट पुरेसे नाही आणि काहीही झालं तरी बिल तू देणार असल्यामुळे मी कॅव्हियार घेणार आणि तिच्याबरोबर तुम्ही इंग्लिश लोक ज्याला कटलेट म्हणता ते आणि पिंक शँपेन." टिफानी केस - आकर्षक, सोनेरी केसांची, भेदक नजरेची, बेफिकीर वृत्तीची मुलगी, जिच्यामुळे कोणीही सहज संकटात सापडू शकेल ! हि-यांचे स्मगलिंग करणारी टोळी आणि जेम्स बाँड यांच्यामध्ये ती उभी राहिली. अफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंत पसरलेल्या या टोळीत हेरगिरी करण्यासाठी बाँडने तिला वापरले. पण अमेरिकेत खुद्द तोच संकटात सापडला आणि त्याला अनपेक्षित मदत लाभली ती या टिफानीची.
-
Mehboob Khan (मेहबूब खान)
मेहबूब खान... मदर इंडिया या अजरामर चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक. अनमोल घडी, अंदाज, अमर, आन अशा अविस्मरणीय कलाकृतींची मालिका निर्माण करणारे मेहबूब. रुपेरी पडद्यावरील आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांना चकित करणाऱ्या मेहबूब यांची जीवन कहाणी देखील तशीच थक्क करणारी. चित्रपट सृष्टीला मनाचे स्थान मिळवून देणाऱ्या, भारतीय चित्रपटांची पताका आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवणाऱ्या मेहबूब यांचा कलंदर प्रवास उलगडणारा हा रसिला ग्रंथ.