-
CCTVnchya Gard Chayet (सीसीटीव्हींच्या गर्द छायेत)
विद्यमान मानवी संस्कृतीवर तंत्रज्ञान क्रांतीचे अनेक तऱ्हेचे भलेबुरे परिणाम झाले आहेत. नवऔद्योगिक व तंत्रज्ञानप्रणित आधुनिकोत्तर काळाच्या परिणामातून गीतेश गजानन शिंदे यांची कविता निर्माण झाली आहे. या जगातले ताणतणाव आणि पेच त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहेत. भूतकाळातील मानवी जग, निसर्गसृष्टी आणि सध्याच्या जगातील अंतर्विरोधातून ही कविता निर्माण झाली आहे. हरवलेली स्वप्नभूमी आणि आत्ताच्याकृष्णविवरातील छायांनी या कवितांना आकार प्राप्त झाला आहे. भूतकाळातील भरलेपणाची जाणीव आणि विविध प्रकारच्या अंतरायाचा स्वर या कवितांमधून ऐकू येतो. आजच्या जगातील रिळाचित्रदर्शनातील (रिल्समधील) स्वमग्न, सेल्फी समाजाच्या एकाकी रंजनमायेची असोशी या कवितेतून प्रकटलीअसून आभासी मायाजाळात हरवलेल्या जगाच्या मायाबंधाची ही जाणीव आहे. भाषा आणि भावना रक्तबंबाळ झालेल्या जगाचे हे संवेदन आहे. कवितेतील या ताणतणावाला समांतर स्त्रीत्वाचा आणि वडील-मुलाचा जाणीवशोध आहे. स्त्रीचा सृष्टिशोध तसेच इतरेजनांचा तिच्याविषयीचा शोध या कवितेत असून त्यास गतविस्मृतींचे पदर आहेत. तर वडील आणि मुलातील विस्कटलेल्या विसंवादात विभक्तपणाची जाणीव आहे. हरवलेल्या जगाचा आठवशोध म्हणून या कवितेत समुद्र, झाड, स्वप्नं आणि हिमालय शोधाला विविध परिमाणे प्राप्त झाली आहेत. आधुनिकतावादी, सामाजिक तर काही प्रमाणात भावकवितेची सरमिसळ गीतेश शिंदे यांच्या कविताविश्वात आहे.
-
Samudramanthan (समुद्रमंथन)
समुद्रमंथन’ ही कादंबरी पूर्वी ‘रेवन रॉय’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाली होती. कथा - रेवन रॉय नावाचा निराशावादी मानसशास्त्रज्ञ विश्वाला संपवण्याची एक अनोखी योजना आखतो. तो सात समविचारी सहकारीही मिळवतो. पण... समांतर विश्वातील (parallel universe) तोच रेवन रॉय हा एक सज्जन आणि प्रेमळ गृहस्थ असतो. त्याला दुसऱ्या विश्वातील रेवन रॉयचा भयंकर प्रयोग समजतो, तेव्हा त्याच्यासमोर विश्वाला वाचवण्याचं आव्हान उभं राहतं. समांतर विश्वातील रेवन त्याच्याच दुसऱ्या भागाला, अर्थात आपल्या विश्वातील रेवन रॉयला, थांबवू शकेल का? आणि हे सगळं घडतं फक्त १२ तासांत !
-
Mahabharatatil 108 Adbhut Rahasye (महाभारतातील १०८
महाभारतातील शस्त्रांचे मूळ श्लोकांच्या संदर्भासह वर्णन (श्लोकांचा अर्थही दिला आहे), अनेक अपरिचित कथा, तत्कालीन भारताचं वर्णन, देव-असूर संबंधावर प्रकाश, थक्क करणाऱ्या घटनांची माहिती अनेक रेखाचित्रांसह ! संग्रही असावेच असे पुस्तक!प्रत्येक प्रकरणात महाभारतातील मूळ श्लोक मराठी अर्थासह नमूद केला आहे. 2. १ लाखाहून अधिक श्लोक असणाऱ्या महाभारतातील निवडक १०८ थक्क करणाऱ्या कथा संदर्भासह पहिल्यांदाच उपलब्ध. 3. तत्कालिन भारताचे वर्णन. काश्मीर, केरळ अशा अनेक प्रदेशांचे वर्णन. 4. देव-असूर संबंधांवर प्रकाश. त्यांच्यातील संवाद आणि संघर्षाचे विवरण. 5. कौरव जन्मासारख्या प्रसंगांबाबत महाभारतात नेमके काय भाष्य आहे, त्याचे स्पष्टीकरण. कवीने नोंदवलेल्या तंत्राचे वर्णन. 6. शेकडो विमानांचा उल्लेख व कृष्ण-अर्जुन वापरलेल्या विमानांची माहिती. 7. विशेष प्रसिद्ध नसणाऱ्या कौरव आणि पांडवांच्या कुटुंबातील महत्त्वाच्या घटना 8. अनेक रेखाचित्र आणि चार मोठी व्यक्तिचित्र! 9. श्रीकृष्णांनी लढलेल्या विविध युद्धांची माहिती व कल्पना येण्यासाठी नकाशा. 10. शांतीपर्वातील राज्यशास्त्रीय बऱ्यावाईट नियमांचे विवरण. तत्कालिन समाजरचनेची माहिती.
-
Tathagat (तथागत)
तथागत' कादंबरीबाबत – ★ कादंबरी आत्मनिवेदन शैलीत लिहिली आहे. तथागतांच्या जीवनातील मुख्य व्यक्तिरेखा वाचकांना तथागतांचे चरित्र सांगतात, अशी रचना आहे. ★ तथागत गौतम बुद्धांची पत्नी यशोधरा, पिता शुद्धोधन, शिष्य सारिपुत्त, शिष्या खेमा अशा एकूण ६ व्यक्तिरेखा कथा सांगतात. ★ कादंबरी ५०२ पानांची आहे. उत्तम बांधणी, UV कोटिंगचे मुखपृष्ठ आणि व्यक्तिचित्रांमुळे वाचकांना अधिक प्रभावित करावे, असा प्रयत्न आहे. ★ तथागतांच्या जीवनाचे अनेक अज्ञात पैलू यातून उलगडतात. जन्म ते निर्वाण हा संपूर्ण प्रवास कादंबरीत आला आहे. ★ सत्याचा शोध आणि सामाजिक क्रांती हादेखील कादंबरीचा प्रमुख विषय आहे.
-
Urmila (उर्मिला)*
लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिच्या जीवनावर आधारित मराठी कादंबरी. 2. उर्मिलेच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत समग्र जीवनाचे चित्रण करणारी पहिली कादंबरी. 3. मिथिलेतील बालपणापासून ते दोन राज्यांची राजमाता होईपर्यंत तिच्या जीवनाचे अनेक पैलू कादंबरीतून समोर येतात. 4. 'महाकाव्य शिवप्रताप', 'तथागत' (कादंबरी), ‘महाराजाधिराज’ (कादंबरी) आणि ‘महाभारतातील अद्भुत रहस्ये' लिहिणाऱ्या समर यांची कांदबरी!
-
Maharajadhiraj (महाराजाधिराज)
गुप्त साम्राज्याचं सुवर्णयुग साकारणाऱ्या श्री समुद्रगुप्तांच्या जीवनावर आधारित कादंबरी! ऐतिहासिक साधनांच्या आधारे समुद्रगुप्तांच्या वैयक्तिक जीवनाचं आणि त्यांनी लढलेल्या युद्धांचं चित्रण! 'समुद्रगुप्त : एक चिंतन' या परिशिष्टासह!1.सम्राट समुद्रगुप्तांच्या समग्र जीवनावर आधारित कादंबरी. 2. 'समुद्रगुप्त : एक चिंतन' या परिशिष्टातून अनेक ऐतिहासिक तथ्य आणि कादंबरीतील विविध प्रसंगांमागील संदर्भ वाचकांसमोर ठेवले आहेत. 3. अगदी बंधूंसह झालेल्या संघर्षापासून दक्षिणापथातील गर्द अरण्यांमध्ये युद्ध करण्यापर्यंत अनेक आव्हानात्मक परिस्थितींना समुद्रगुप्तांनी कसे तोंड दिले, त्याचे वर्णन. 4. शिवपूर्व काळात ‘परमभागवत’ ही उपाधी धारण करणाऱ्या सम्राट समुद्रगुप्तांचा धार्मिक स्वभाव, अश्वमेध यज्ञ आणि धार्मिक कार्याचे वर्णन. 5. अतिशय उत्तम (प्रिमिअम) कागदाचा वापर आणि मजबूत बांधणी.
-
Radha (राधा)
मोगऱ्याचे तीन सुगंध’ या कादंबरीमालेतील दुसरी कादंबरी. (पहिली कादंबरी – उर्मिला). श्रावणी नावाची बावीस वर्षीय तरूणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबाबत शांतपणे चिंतन करण्यासाठी वृंदावनात जाते. तिथे तिला अनपेक्षितपणे राधा भेटते. श्रावणीला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतात. ती राधेला ते प्रश्न विचारते. राधा त्या प्रश्नांची उत्तरं देतांना वृंदावनातील तिच्या आठवणीही सांगते. श्रीकृष्ण आणि राधेचं नातं श्रावणीला राधेच्या दृष्टीकोनातून समजतं. त्या दोघींच्या संवादातून प्रेम, पुरूष आणि नैतिकतेचे अनेक पैलू उलगडतात. तेच हे एक 'कादंबरीमय उपनिषद!'