-
In Black And White
इन ब्लॅक अॅन्ड व्हाईट – सुख-दुःखाचे निदर्शक असणारे हे दोन रंग. या भेदाच्या सीमारेषांवर आपल्या रंगीबेरंगी आयुष्याचा पट साकारणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार मनजित बावा यांच्या कलाजीवनाचा आविष्कार.
-
A Mascud Pakistan
एखाद्या गूढ, अनाकालनीय गुहेप्रमाणे ज्या देशाबद्दल कायम कुतूहल वाटत आलं, ज्या देशाच्या मानसिकतेबद्दल कायम तर्क-वितर्क करणं हाच सा-या जगाचा छंद झाला, त्या देशाचा नुसता प्रवास न करता, त्या देशाचा भाव व स्वभाव, जीवनाचे शेकडो अल्वार कप्पे उलगडण्याचं मोलाचं काम श्री. प्रवीण कारखानीस यांनी या पुस्तकाद्वारे केलं आहे.
-
Baimanoos
घरात बाईमाणूस असले म्हणजे घराला घरपण येते, असे म्हणतात. पण स्त्रीची अवहेलना गेल्या अनेक शतकांपासून होत आहे. स्त्रीला पुरुषापेक्षा दुय्यम, कमकुवत व दुर्बल समजल्याने तिच्या विकासाची पहाट स्त्रीमुक्ती चळवळीनंतर उगवली. स्त्री ही मानव आहे. पुरुषांच्या बरोबरीने तिला हक्क, अधिकार आहेत, तिला स्वतंत्र स्थान आहे, हे सांगण्यास सुरुवात झाली. या चळवळीचे वर्णन 'बाईमाणूस' मधून करुणा गोखले यांनी केले आहे.