-
Raobahadur Dattatray Balwant Parasnis Charitra V K
आपण इतिहास वाचतो कारण इतिहासापासून शिकण्यासारखे बरेच असते. त्यापासून आपल्याला स्फूर्ती मिळते. इतिहासातील चुकांपासून आपल्याला काही शिकवण मिळते. दीडशे वर्षांपूर्वीच्या त्या काळात माणसाच्या गरजा मुळात कमी होत्या. सोयी कमी होत्या. फक्त माणसाच्या स्वप्ने पाहण्याला जशी मर्यादा नसते तशी त्या काळातही माणसे मोठी स्वप्ने पाहत असत. नुसती पाहत नसत तर ती पूर्ण करण्यासाठी झटत असत. पारसनीस याला अपवाद नव्हते. अगणित वस्तू आणि हजारो कागदपत्रे, जुनी चित्रे, नाणी याचा संग्रह असलेले भारतातील पहिले बहिले ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय. त्यांची अफाट जिद्द, असीम इच्छाशक्ती, आत्मविश्वास याच्या बळावर ते हे पूर्ण करू शकले. शिक्षण अपुरे होते म्हणून ते हातपाय गाळून बसले नाहीत. त्यांची इच्छाशक्ती मजबूत होती. तिला त्यांनी प्रयत्नांची साथ दिली. शिक्षण म्हणजे सर्वस्व नव्हे, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. जे स्वप्न त्यांनी पाहिले होते, ते पूर्ण झालेले पाहिले. आलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले. त्यांनी आपली कुवत जाणली होती त्याचबरोबर आपली ताकद ही पूर्णपणे जोखली होती. त्यांच्या ध्येयाच्या वाटेवर कोणकोणती आव्हाने आहेत? कोणते धोके पत्करावे लागतील? हे ते ओळखून होते. शिक्षणाची संधी जरी हुकली तरी, त्यांनी त्यांच्या इतिहासाच्या छंदाला मुरड घातली नाही. तो उत्तरोत्तर वाढतच गेला. संकटाचे संधीत रूपांतर करणे आणि आपली प्रगती करणे, ही शिकवण आजच्या युवा पिढीला त्यांच्या चरित्रातून घेता येण्यासारखी आहे.
-
-
Valmiki Ramayanatil Paach Striya (वाल्मिकी रामायणा
राजा दशरथाच्या शांता या कन्येने असीम त्याग केला नसता, तर त्याला त्याचे हवेहवेसे वाटणारे पुत्र प्राप्त झाले असते का? कोण होती मंथरा ? राणीची धूर्त आणि दुष्ट दासी, की राजप्रासादातल्या षड्यंत्रापासून आपल्या पाल्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न करणारी प्रेमळ माता? मीनाक्षीच्या सुंदर डोळ्यांचं रूपांतरण कुरूपता आणि अनैतिक लालसेत कसं झालं? एका सदाचारी राजकुमाराभोवती फिरणाऱ्या महाकाव्यात स्त्रियांची भूमिका कोणती? आनंद नीलकंठन हे अत्यंत लोकप्रिय लेखक आहेत. या पुस्तकात त्यांनी वाल्मिकींच्या कालातीत महाकाव्याचे अनेक पदर उलगडत महत्त्वाकांक्षा, प्रेम, समर्पण आणि धैर्य यांच्या कथा समोर आणल्या आहेत. रामायणातल्या स्त्रियांकडे नव्याने पाहण्याची दृष्टी ते त्यांच्या वाचकांना देऊ पाहतात. प्रेयसी, बहीण, पत्नी, माता अशा विविध रूपांत वावरणाऱ्या वाल्मिकींच्या रामायणातल्या या स्त्रिया गुंतागुंतीच्या ह्या महाकाव्याला एकत्र गुंफतात.
-
Ichapatra Kalachi Garaj (इच्छापत्र काळाची गरज)
इच्छापत्र हा थोडा भावनिक विषय आहे. या विषयाबद्दल अनेक समज- गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. मुळातच माहितीचा अभाव आणि जागरुकता नसल्यामुळे इच्छापत्र करण्याबाबत उदासीनता दिसून येते. सर्वसामान्य माणसाला या विषयावर सोप्या भाषेत कायदेशीर माहिती देणारे हे पुस्तक त्यासाठीच उपयुक्त आहे. आपल्या मृत्युपश्चात वारसांमध्ये वाद-विवाद टाळण्यासाठी आणि आपली मिळकत लाभार्थीपर्यंत पोहोचावी यासाठी आवर्जून वाचावे असे हे माहितीपर व मार्गदर्शनपर पुस्तक अत्यंत मोलाचे आहे.
-
Mazi Aatmakatha (माझी आत्मकथा)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि कायदा या विषयांमधील उच्च कोटीचे विद्वान होते. आर्थिक अडचणींवर मात करून दुहेरी पीएच.डी. प्राप्त करणारे आंबेडकर हे अत्यंत प्रतिभावंत विद्यार्थी होते. अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक, वकील अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी मूलभूत काम करताना वृत्तपत्रांची निर्मिती केली. कायमच दलितांच्याराजकीय हक्कांचा पुरस्कार केला. भारतीय स्वातंत्र्य मिळवताना इंग्रजांना फटकावण्यासही त्यांनी कमी केले नाही. ते अतिशय स्पष्टवक्ते होते. त्यांच्या अनेक लेखांतून स्वतःबद्दलचे निवडक लेख वाचकांना निश्चितच प्रेरणादायी ठरतील. “सैन्यातील नोकरीमुळे आम्हाला आपले जीवनमान सुधारण्याची संधी लाभली होती. त्यामुळे बुद्धिमता चातुर्य आणि तडफ यांबाबतीत आम्ही इतरांपेक्षा वीतभरही कमी नाही, हे सिद्ध करू शकलो. आमच्या गुणांमुळेच सैन्यातील अधिकायांच्या जागी आमच्या नेमणुका झाल्या त्याकाळी सैन्य छावणीतील शाळांमध्ये हेडमास्तरांच्या जागी अस्पृश्य नेमले जात असत. सैन्य छावणी कॅम्पसमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे असल्याने त्याचा योग्य तो परिणाम जीवनावर झाला आहे. सैन्याचे दरवाजे महार जातीसाठी बंद करून ब्रिटिशांनी आमच्याशी विश्वासघात केला असून, ते कृतघ्नतेचे लक्षण आहे.’ अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक सडेतोड विधाने वाचताना वाचक अचंबित झाल्याशिवाय राहणार नाहीत.