-
Mumbai Kalchi (मुंबई कालची)
मुंबई शहरावर जेवढं विविध भाषेत वाड्मय निर्माण झालं तेवढं अन्य कोणत्याही शहरावर नसावं. मुंबई शाहिरांनी कवींनी कविता केल्या, कथा लिहिल्या, प्रतिभावंतानी कादंब-या बेतल्या. मुंबईवर जीवापाड जीव लवायला तिच्यावर प्रेम करायला शिकवणारी अनोखी कलाकृती, 'मुंबई कालची.'
-
Hrudyarog Aani Aapan ( हृदयरोग आणि आपण )
ह्रदयविकारासंदर्भात अथपासून - इतिपर्यंत असे या पुस्तकाचे सार्थ वर्णन करता येईल. हार्ट अटॅक आल्यावर पहिल्यांदा ताबडतोब काय करावे, अचानक ह्रदय बंद पडल्यास ( कार्डिऍक अरेस्ट) कोणती पावलं उचलावीत, ह्रदयविकार असणाऱ्यांचा आहार, व्यायाम, इतकच नाही तर इसीजी, इको टेस्ट, कलर डॉपलर, अँजिओप्लास्टी, बायपास यासारख्या तांत्रिक गोष्टी अतिशय सोप्या भाषेत समजावून दिल्या आहेत. ह्रदयविकारावरील इतक्या सांगोपाग पद्धतीने लिहिलेले हे पहिलेच पुस्तक म्हणावे लागेल. हे पुस्तक ह्रदयविकारासंदर्भातील आपले अनेक गैरसमज दूर करते, आपल्याला शास्त्रशुद्ध माहिती देते. शिवाय प्रतिबंधक स्वरूपाचे कार्यही करते. एका निरामय, सुदृढ, आनंदी जीवनासाठी हे पुस्तक म्हणजे मार्गदर्शक आहे.