-
Savad Manyavarashi (संवाद मान्यवरांशी)
या पुस्तकात आपल्याला विज्ञान,उद्योग,तत्रज्ञान. साहस,अभिनय,काव्य,लेखन,निवेदन,साहस निवेदन,संस्कृतीदर्पण अशा विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीचा परिचय होईल. किशोरवयीन मुलांनी आवर्जुन वाचावे असे हे पुस्तक. या उतुंग मान्यावरची यशोगाथा सर्वत्र वाचकांना विशेषत युवावर्गाला प्रेरणादायी ठरेल हे निश्चित. या मुलाखती घेणारा सौ. प्रतिमा जोशी या विस्तार इलेक्ट्रोनिक प्रा.लि. या कंपनीच्या डिरेक्टर होता. निवारा वृद्धश्रमात त्या ऑनररी होमोपिथि म्हणून काम पाहतात. तसेच भगिनी निवेदिता प्रतिष्टान या पुण्यातील सेवाभावी संस्थेच्या त्या अध्याक्षा होता. या पूर्वी त्याची पाच पुस्तके प्रदर्शित झाली आहे.
-
Sarwasakashi (सर्वसाक्षी)
मरणाच्या काही घटका अगोदर त्याने मला उद्देशून जे अखेरचे पत्र लिहिले होते त्याचा शेवट साहित्यिकाला साजेसा केला होता. तो नावाने पवन गायकवाड होत. परंतु नदीकाठच्या सामान्य धोंडयाइतकीच आपली लायकी असल्याचे त्याने सूचित केले होते. गो. नी दांडेकरांना कल्पनाही आली नसती की आपल्या एका कादंबरीच्या नावाचा अशा प्रकारचा उपयोग कधी काळी कोणी करील! गायकवाडने तसे करून दाखवले होते! आपल्या लहानशा आयुष्यात त्याने म्हटले तर पुष्कळ काही केले म्हटले तर काही केले नाहीही! त्याने केले असेल नसेल. पण सर्वांचा साक्षीदार मात्र मला करून ठेवले होते.
-
Maitra ( मैत्र )
माधवी कुंटे यांचा हा तेरा कथांचा कथासंग्रह ज्यात स्त्री मनाचे चित्रण केले आहे. विविध भावना प्रसंग याचे प्रसंगानुरूप लेखन वाचनीय आहे.