-
Smaran (स्मरण)
साहित्यिकांच्या शोध अखेरतः अनेक आवरणांच्या आत दडलेल्या माणसाचा शोध असतो... दोन विचारांच्या भिन्न तळांवर असतानाही ज्यांच्या स्मरणावर हि सुंदर फुले वाहताना अडथळा जाणवला नाही! शेवटी स्नेह हा मनाचे उंबरठे ओलांडणारा असतो!
-
Gavaksh. (गवाक्ष)
या सृष्टीत एक नियमबद्ध अशी चाकोरी आहे. प्रत्येक घटनेमागे एक शिस्त आहे, अखंड चालत आलेली. कोण घडवितो हे? सुत्रचालक कोण? तो हे सारे उपद्व्याप कशाला करतो? त्याच्या या योजनेला आव्हान देत येईल का? शोध अखंड चालू आहे...
-
Har Ani Prahar (हार आणि प्रहार)
मनुष्याचे चारित्र्य हे बव्हंशी स्वतःच्या आत्मविश्वासावर व कार्यपद्धतीवर अवलंबून असते; कोणाच्या टीकेवर नव्हे. चुकीच्या रस्त्याने निघालेल्याला थोपवून योग्य रस्त्याकडे फिरवता येते; पण ज्याचा ठिकाणाच जेथे वाममार्गी आहे-त्याला ठेचावच लागते,राक्ताबाम्बळ करावेच लागते... प्रसंगी नष्टही करावे लागते.
-
Parajay Navhe Vijay (पराजय नव्हे विजय)
स्वतःचे जीवन अत्यंत कष्टाचे गेले. पुढे सांसारिक जीवनातही मुलाचा मृत्यू पाहावा लागला. मात्र हे दुःख विसरून अनाथ मुलांचा सांभाळ करून त्यांना प्रेमाची सावली दिली विजय फळणीकर यांनी. चित्रपटात शोभेल अशी थरारक; पण खरीखुरी जीवन काहाणी फळणीकर यांनी 'पराजय नव्हे विजय' या आत्मचरित्रात सांगितली आहे. अनाथ, निराधार मुलांसाठी त्यांनी 'आपलं घर' वसविले. यात मुलांना सर्व सोई पुरविल्या जातात. चांगले शिक्षण दिले जाते. माणूस म्हणून आवश्यक मूल्य त्यांच्यात रुजविली जातात. स्वतःचे दुःख विसरून माणुसकीवर विश्वास ठेवून फळणीकर पतीपत्नीने स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिले. आता वृद्धांचा सांभाळही ते आपुलकीने करतात. त्यांच्या या चरित्रकथेतून सामन्य माणूस काय करू शकतो याचे उदाहरण त्यांनी घालून दिले आहे.
-
Prabhavi Samvad (प्रभावी संवाद)
मुल जन्माला आले की त्याचा आईशी स्पर्शातून संवाद सुरु होतो. हळूहळू शब्द, भाषेचे ज्ञान झाल्यावर संवादाचे क्षेत्र विस्तारते. रोज बोलणारी भाषा अवगत असली तरी प्रभावी प्रभावी संवाद साधने सर्वांनाच शक्य होते असे नाही. त्यासाठी तयारी, सराव करणे गरजेचे असते. बदलत्या युगात जाहिरातबाजीच्या काळात तर संवादा शिवाय पान हलत नाही. सामान्यांपासून अगदी कोणतीही नोकरदार, व्यावसायिक यांना योग्य शब्दामधून प्रभावी संवाद साधने आवश्यक ठरते. यासाठी डॉ. प्रमोद जोगदेव यांनी 'प्रभावी संवाद' मधून संवादकौशल्याचे महत्व विशद केले आहे. संवाद साधण्यापूर्वी काय विचार करायला हवा, दैनंदिन जीवनातील संवादाचे स्थान, संवाद क्रांती, त्यातील अडथळे, विविध स्तरांतील संवाद, संवादकौशल्याची वाढ, आधुनिक संवादाविषयी मार्गदर्शन केले आहे. चित्रपट, नाटक, कथा, यामधील संवादाचे दाखले देत त्यांनी त्याचे महत्व, त्याचा प्रभाव व त्यानुसार संवाद कसा साधावा हे सांगितले आहे