-
Vichar Vilasite (विचार विलसते)
आजवरच्या वाचनातून, चिंतनातून आणि अल्पजीवी अनुभवातून मला विचार मिळाले. विचार आले तसे ते तुटक अनुभव लुप्त झाले. तपशिलांप्रमाणे बरेच विचारही गहाळ झाले; परंतु त्यांनी आपल्यातील सार शिल्लक ठेवले. विचार गेले पण सरणी राहिली. व्यवहारात या तत्वांना मी माझी मते म्हणतो. ही प्रमेये चिरंतन आहेत. त्यांनी माझ्या मनाची व जीवनाची घडण केली आहे. यांनीच माझ्या अस्मितेला आकार दिला आहे. ही तत्वे आणि त्यांच्याभोवती गुंतलेल्या व गुरफटलेल्या माझ्या भावना हे माझ्या जीवनाचे मर्मबंध अहेत. त्यांच्या बळावरच मी जगात आहे.
-
Kimaya( किमया)
किमया ’ ही एक वाटचाल आहे, दैनंदिन जीवनांतील रूक्ष व्यवहारी भूमिकेकडून, सौंदर्याने ‘फुली फुलून’ आलेल्या विश्वाच्या उत्कट व संपन्न जाणीवेकडचा हा प्रवास आहे. लेखक माधव आचवल हे व्यवसायाने आर्किटेक्ट. कलात्मक दृष्टी लाभलेलं, मनात निर्माण होणार्या भावनांना तितक्याच अलवारपणे शब्दरुप देणारं संपन्न व्यक्तिमत्त्व! रेती-माती-दगड-विटांमध्ये वावरत असताना त्यातील सौंदर्यामध्ये रमणारा हा लेखक. मनातले भाव आणि ते व्यक्त करणारे शब्द ह्यांचा वापर इतका अचूक आहे की आपल्याला माहिती असलेल्या गोष्टीदेखील नव्या भासतात. ते दृश्य जसंच्या तसं आपल्यासमोर उभं रहातं. ताजमहालाचं पाण्यात ‘डुचमळणारं’ सौंदर्य, आगगाडी अंधार्या बोगद्यात शिरून उजेडात बाहेर पडणं... आपणही बोगद्यांतून अनेकवेळा प्रवास केलेला असतो. मग तो बोगदा मुंबई-पुण्याच्या वाटेवरचा असो किंवा जम्मू-श्रीनगर वाटेवरील लांबलचक जवाहर बोगदा असो! लेखकाने केलेल्या वर्णनांतून हे अनुभव नवेच भासू लागतात. ‘किमया’सारख्या पुस्तकांच्या एका वाचनाने कधीच समाधान होत नाही. ती अधून-मधून, पुन:पुन्हा वाचावीशी वाटतात. आपलं रोजचं जगणं अर्थपूर्ण बनवण्यासाठी ते फार आवश्यक असतं.
-
Gost Mendha Gavachi (गोष्ट मेंढा गावाची)
मेंढा गावाची ही गोष्ट कशासाठी सांगितली आहे? ही एवढ्यासाठीच सांगितली आहे की ज्यांना एरवी ग्रामीण - आदिवासी म्हणून संबोधले जाते ती माणसे किती शांतपणे , सभ्यपणे आणि तरीही किती निश्चयाने आपले जीवन जगात अ[...]
-
Manatil Maanas (मनातील माणस)
आपल्या जवळच्या माणसांच्या आठवणी कायम आपल्या मनात ताज्या असतात. त्यात आई-वडील, कुटुंबीय शिक्षक, स्नेही, मित्र-मैत्रिणी यांचा समावेश असतो. उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर त्यांनी त्यांच[...]