-
Shilp (शिल्प )
स्त्रीवादी भूमिकाच नव्हे तर कुठलीच भूमिका न घेता, भिडलेल्या अनुभवाशी प्रामाणिक राहून स्वतःचा असा संयत सूर सातत्याने जपणारी मोनिका गजेंद्रगडकर यांची कथा... वेगळ्या अनुभवांना सामोरं जाणार्या आणि जाणिवांची सूक्ष्म णी खोल रूपं शोधणार्या त्यांच्या दीर्घकथेन मराठी कथाविश्वाला म्हणूनच स्वतःची दखल घेणं प्राप्त केलं. अनुभवविश्वाचा परीघ विस्तारात गेलेली नि जीवनविषयक अनेक प्रश्नांचे मान देणारी वेगळ्या वाटेवरची 'चर्चाकथा', हा ज्येष्ठ लेखिका विजया राजाध्यक्ष यांनी या कथांचा केलेला रूपबंधात्मक आगळा गौरव म्हणूनच सार्थ वाटतो.
-
Zen Garden
झेन गार्डन हा मिलिंद बोकील यांचा दुसरा कथासंग्रह. मिलिंद बोकिलांची सामाजिक कार्यकर्ता या नात्याने सतत जागृत असणारी तीव्र संवेदनशीलता त्यांच्यामधीललेखकाला पूरक आणि त्यांच्या कथाविश्वाला समृद्ध करणारी ठरली. समाजातील तळागाळातील माणसांचे प्रश्न समजून घेतानाच, त्याच्या जीवनाच्या आडव्या-उभ्या छेदांना ठिगळासारखे अपरिहार्यपणे जोडले जाणारे समाजाचे ओंगळ, विसंगत दर्शन त्यांच्या कथांतून ठळकपणे सामोरे येत जाते आणि 'सथीन', 'पायऱ्या'...यांसारख्या या संग्रहातील काही कथांचे आशयकेंद्र सामाजिक प्रश्नांशी, समस्यांशी अलगद नि सूक्ष्मपणे जोडले गेलेले जाणवते.